अ-हेरनवरगाव येथे प्रभू श्रीराम चंद्र जन्मोत्सव भव्य शोभा यात्रेची मिरवणूक शांततामय वातावरणात.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,३१/०३/२३ वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचा वारसा जपण्यासाठी,पंचक्रोशीत नाव गाजलेल्या अ-हेरनवरगाव येथिल श्रीराम नवमीची ख्याती टिकवून ठेवण्यासाठी येथील बाजार चौकात श्रीराम जन्मोत्सवाची यात्रा भरविण्यात आली.गावातील आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्याकरीता रात्रोला भजन,पूजन,कीर्तन,आणि स्वरमाला म्युझिकल जागरण व डान्स ग्रुप राजनांदगाव यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
श्रीराम जन्मोत्सव उत्सवात तलाव देवस्थान ,श्रीराम मंदिर, सेवा समिती,श्रीकृष्ण मंडळ आणि श्रीरामचंद्र मंडळाने आपापल्या मोहल्यातील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिकृतीचे रथ यात्रा पाहणारे आणि भाविकांच्या दर्शनासाठी यात्रेत नियोजित जागेवर मांडून ठेवले.प्रभू श्रीरामचंद्राची भव्य मिरवणूक शांततेत गावातून काढण्यात आली.मिरवणुकीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शांततेत शोभायात्रा पार पडावी म्हणून ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकररावजी आंभोरे यांनी जनतेला केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देत आपापसातील मतभेद विसरून भाऊबंदकीने गावात शांतता टिकवून ठेवली आणि आनंदमय वातावरणात प्रभू श्रीरामचंद्राची मिरवणूक पार पडली.