नंदकिशोर वाढई यांची काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिवपदी निवड.
एस.के.24 तास
राजुरा : (राजेंद्र वाढई) आमदार सुभाष धोटे यांचे समर्थक, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे काँग्रेस कार्यकर्ते, कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांची मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ बी सी विभाग बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या ओबीसी विभागाच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय नेते आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अ. भा. काँ. ओबीसी अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली म. प्र. काँ. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानूदासजी माळी यांनी नंदकिशोर वाढई यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या सचिवपदी निवड केली आहे.
नंदकिशोर वाढई हे एका शेतकरी कुटुंबातील असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनुयायी, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते असुन अनेक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. सध्या कळमना ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून ते काम पाहत आहेत. अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत. त्याचबरोबर काँग्रेस ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल वरीष्ठ पातळीवर घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, गोविंदराव भेंडारकर, विदर्भध्यक्ष काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सल्लागार ओबीसी विभाग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, हमीदभाई, नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रदेश काँग्रेस ओबीसी सरचिटणीस उमाकांत धांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, तालुका अध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, जि प सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदा जेनेकर, माजी उपसभापती मंगेश गुरनुले, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम यासह तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान सेल, अल्पसंख्यक विभाग, अनु जाती अनु जमाती विभाग, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.