महिलांनी अत्याचारा विरोधात पुढे यायला पाहीजे. - शिवानी वडेट्टीवार
■ अंतरगाव येथे महिला दिन कार्यक्रम थाटात साजरा.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
सावली : "अजूनही महिला पुरुष समानता नाही, काही काम करायचे असल्यास घरच्या पुरुष मंडळींची परवानगी घ्यावी लागते.ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची साथ सावित्रीबाईंना होती तशी साथ पुरुषांनी द्यावी. आता वाट न पाहता महिलांच्या अत्याचाराविरोधात महिलांनीच समोर यायला पाहीजे " असे वक्तव्य सिनेट सदस्यां शिवानी वडेट्टीवार हे अंतरगाव येथे उमेद प्रभाग संघाच्या वतीने आयोजित महिला दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण महिलांनी केले.
कार्यक्रमात महिलांनी जागृतीपर गीत, वयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संचालन राखी संगीडवार, जयश्री चेकबंडलवार यांनी तर आभार शिवानी कागदेलवार यांनी मानले.