महाविदयालयीन तरूणींची छेड काढणाऱ्या आरोपीस काही तासांत अटक.


महाविदयालयीन तरूणींची छेड काढणाऱ्या आरोपीस काही तासांत अटक.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रम्हपुरी :०९/०३/२२ शहरामधील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरूण मुलींची छेड काढणाऱ्या अनोळखी आरोपीस ब्रम्हपूरी पोलीसांनी काही तासांत पकडून गजाआड केले. 


त्याचेवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.सविस्तर वृत्त असे की, दि. 8 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजे च्य दरम्यान ब्रम्हपूरी वखार महामंडळा जवळून पीडीत तरुणी ही आपल्या राहत्या घरून कॉलेज कडे जात असताना एका अनोळखी आरोपीने तीच्या मागून मोटारसायकलने येऊन तीचा अश्लील स्पर्श करून तीची छेड काढली. 


पीडीत मूलगी ही घाबरून ओरडली असता त्याने पळ काढला. परंतू पुढे जाऊन परत खेड रोडवर दुसऱ्या तरूणीची छेड काढली. परंतू तरूणीने लगेच स्वतःला सावरून त्याचे मोटारसायकलचा नंबर लक्षात ठेवला. व पोलीसांना डायल 112 वर कॉल केले. ब्रम्हपूरी पोलीसांनी त्वरीत हालचाल करून पीडीत मुलीशी संपर्क साधला. परीवहन अॅपवरून सदर मोटारसायकल नंबर MH-34 AT-7101 काढून आरोपी मूलाचा शोध घेतला असता त्याचे नाव नरेश सुरेश दिवटे, वय 27 वर्ष,मजूरी रा. पारडगाव ता. ब्रम्हपूरी असे निष्पन्न झाले. 


त्यास पोलीस ठाण्यात आणून गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हयांची कबूली दिली. पीडीत मुलीच्या तक्रारी वरून आरोपी विरूध्द कलम 354 भादवीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार पोनी सुधाकर आंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !