शिक्षक आमदार विक्रम काळे यांची परीक्षा केंद्रांना भेट. राज्य मंडळाचा पथक समस्या जाणून घेतल्या.



शिक्षक आमदार विक्रम काळे यांची परीक्षा केंद्रांना भेट.


राज्य मंडळाचा पथक समस्या जाणून घेतल्या.


एस.के.24 तास


भंडारा : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान सदस्य तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेचे  राज्य सदस्य ,छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद मराठवाडा विभागाचे शिक्षक आ.विक्रम काळे यांनी नागपूर व भंडारा जिल्ह्यातील इयत्ता  दहावीच्या परीक्षा केंद्रांना परीक्षा काळात २५ मार्च रोजी आकस्मिक भेटी देऊन परीक्षा केंद्रांची मोका पाहणी केली.


  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या  लेखी परीक्षेचे  २ मार्च पासून आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान  परीक्षा सुरळीत पने पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली  होती .याबरोबरच राज्य शिक्षण मंडळ पुणे चे  राज्य सदस्य सुद्धा परीक्षा केंद्रांना भेटी देत असतात.परीक्षा कालावधीचे औचित्य साधून २५ मार्च रोजी इयत्ता दहावी माध्यमिक शालांत परीक्षेचा भूगोल विषयाचा पेपर सुरू  असतांना आ.विक्रम काळे यांनी आपल्या पथकासह नागपूर शहरातील छत्रपती विद्यालय नागपूर,कुही तालुक्यातील कूही कस्टोडी केंद्र कुही,मौदा तालुक्यातील जनता विद्यालय मौदा, तसेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सुदामा विद्यालय मोहाडी येथील परीक्षा  केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता परीक्षा सुरळीत व  शांततेत सुरू असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी समाधान व्यक्त केले. 


यावेळी पथकात शिक्षक  आ.विक्रम काळे यांचे सह महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नागपूर विभाग प्रांत अध्यक्ष खेमराज काळे,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नागपूर विभाग कार्याध्यक्ष देवेंद्र सोनटक्के,विभागीय उपाध्यक्ष अशोक काणेकर,नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत नीखाडे,सुनीता तोडकर,उपस्थित होते.


त्यानंतर  राखीव कालावधीत  शासकीय विश्राम गृह भंडारा येथे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांसाठी सभेचे आयोजन करून शिक्षक शिक्षकेत्तर बांधवा सोबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे,वैद्यकीय प्रतिपूर्ती रजा देयके,रजा रोखी करण देयके,वाढीव महागाई भत्ता देयके तसेच सातव्या आयोगाची दिली जाणारी हप्ता देयके,मासिक वेतन दर महिन्यच्या एक तारखेला अदा करणे  या समकक्ष थकीत देयके तसेच अंशतः अनुदानित शाळा अनुदान  व वेतना बाबत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी सांगोपांग चर्चा केली असता मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मागणी वजा समस्या सोडविण्याचा आग्रह धरला असता.


 आयोजित सभा स्थळी भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक चे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांचे ध्यानाकर्षण करून सदर  समस्या तातडीने कायमस्वरूपी निकाली काढण्याचे निर्देश दिले.


या प्रसंगी शिक्षक आ.विक्रम काळे ,शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नागपूर विभाग अध्यक्ष खेमराज कोंडे,भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नागपूर विभाग कार्याध्यक्ष देवेंद्र सोनटक्के, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निखाडे,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ भंडारा जिल्हा प्रभारी अध्यक्ष सुनीता तोडकर, प्राचार्य प्रदीप मुटकुरे,मुख्याध्यापक राजू भोयर,मुख्याध्यापक प्रवीण गजभिये,मुख्याध्यापक  घोल्लर, मुख्याध्यापिका गहाने,प्रवीण कटरे,मूनेश्र्वर पारधी, सुधाकर आगाशे,मुकुल पारधी,सचिन कटरे,तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !