खालवसपेठमध्ये झालं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयचं उदघाट्न.
रामदास हजारे!ग्रा.प्र!चिरोली
मुल : सावित्रीबाई फुले यांच्या 126 व्या पुण्यस्थिती निमित्य श्री. छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी परिषद खालवसपेठ द्वारा संचालित वाचनालयाचे उदघाट्न पार पडले तेव्हा उदघाटक म्हणून मा.सौ. प्रज्ञा गावतुरे मॅडम, शिक्षिका चिरोली,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. दिपकभाऊ वाढई सरपंच खालवसपेठ तसेच
प्रमुख पाहुणे म्हणून मा.राकेश निमगडे,उपसरपंच खालवसपेठ,मा.प्रमोद शेंडे,अध्यक्ष माळी समाज, मा.नोकाजी पा.शेंडे,मा.दिलीप वाळके,माजी बौद्ध अध्यक्ष,
मा.सौ.नंदाताई शेंडे,पो.पा.खालवसपेठ, मा.गजानन शेंडे,माजी अध्यक्ष,माळी समाज, मा.श्री. अवताडे बाबूजी,मा.संदीप गुरनुले तथा गावकरी.इत्यादी उपस्थित होते.
सौ.प्रज्ञा गावतुरे मॅडम यांनी वाचन संस्कृती जोपासायला पाहिजे असे उदघाटनपर भाषणात बोलले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश भलवे यांनी तर संचालन रोशन निकुरे व आभारप्रदर्शन अविनाश शेंडे यांनी केले.