खरेदी-विक्री समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ; एकमेकांसमोर भिडली. ★ शेतकरी एकता पॅनलचा विजय : राष्ट्रवादी पक्षात दुफळी.

खरेदी-विक्री समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ; एकमेकांसमोर भिडली.


★ शेतकरी एकता पॅनलचा  विजय :  राष्ट्रवादी पक्षात दुफळी.

 

 नरेंद्र मेश्राम!एस.के.24 तास


 भंडारा - सत्ता अन् खुर्चीचा मोह आवरता आला नाही तर मतभेद निर्माण होतात.  त्याचा पर्यवसान द्वंद्वात होते. असाच द्वंद्व मोहाडी सरकारी शेतकी खरेदी -विक्री समितीच्या निवडणूकीत   राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी  एकमेकांसमोर भिडताना दिसली. यात एका  राष्ट्रवादी पक्षाच्या गटाचा दणदणीत विजय झाला.


     मोहाडी सरकारी शेतकी खरेदी -विक्री समितीची निवडणूक बिनविरोध होणार असे चिन्ह दिसायला लागले होते. तथापि , राष्ट्रवादी पक्षातील  किरण अतकरी यांनी शेतकरी जनविकास पॅनल उभी करून निवडणूक घेण्यास तगडया राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या नेत्यांना बाध्य  केले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे जयंत वैरागडे ,सुभाष गायधने व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माधवराव बांते यांनी शेतकरी एकता पॅनल निवडणूकीत उतरविली  होती.  


तत्पूर्वी , पंधरा संचालक मंडळाच्या संख्येपैकी शेतकरी एकता पॅनलचे जयंत वैरागडे,माधवराव बांते ,सुभाष गायधने ,महादेव मोटघरे ,रामप्रसाद बघेले ,जयश्री गायधने , अनिता पोटफोडे  हे सात उमेदवार वैयक्तिक मतदार संघातून बिनविरोध निवडून आले.   सहकारी संस्था प्रतिनिधी ,ईतर मागास प्रतिनिधी ,अनुसूचित जाती /जमाती प्रतिनिधी व भटक्या विमुक्त जाती /जमाती /विशेष मागासप्रवर्ग प्रतिनिधी यामधील आठ  संचालक पदासाठी निवडणूक झाली. सहकारी संस्था मतदार संघ सोडता निवडणूक शेतकरी एकता पॅनलच्या बाजूने एकतर्फी होईल असे चित्र दिसत होते. ते तसेच घडले.


 ईतर मागास प्रवर्गातून प्रभाकर बारई,अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातून कमोद सरोदे तर अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातून गिरिधारि खेडकर हे शेतकरी एकता पॅनलमधून मोठ्या फरकाने निवडून आले. तर शेतकरी एकता पॅनल व शेतकरी जनविकास पॅनल या दोघांनीही सहकारी संस्था मतदार गटाची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली  होती. या गटातून शेतकरी एकता पॅनलने पाच उमेदवार उभे केले होते. तर शेतकरी जनविकास पॅनलने केवळ दोन उमेदवार लढविले . या  चुरशीच्या निवडणूकीकडे सहकार क्षेत्रातील नेत्यांचे लक्ष लागले होते. सहकारी संस्था मतदार गटाच्या निवडणुकीकडे दोन्ही पॅनलनी लक्ष केंद्रित केले होते. या गटाची निवडणूक दोन्ही गटाने  प्रतिष्ठेची बनवली गेली होती. 


 निवडणुकीतले सर्वं शस्त्र वापरले गेलेत. झालेल्या  अटीतटीच्या निवडणूकीत अखेर राष्ट्रवादी पक्षाचे व शेतकरी जनविकास पॅनलचे किरण अतकरी यांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी पक्षाचे जयंत वैरागडे,सुभाष गायधने व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माधवराव बांते यांच्या  शेतकरी एकता पॅनलचे बाळू बारई ,श्रावण कुथे ,रेवाराम गायधने ,सुरेश घरजारे असे चार उमेदवार निवडून आले. शेतकरी जनविकास पॅनलचा एकच संचालक निवडून आला असताना त्यांच्या गटाने फटाके व गुलाल उधळून आनंद साजरा केला. तर शेतकरी एकता पॅनलने मोहाडी नगरात गुलाल उधळत मिरवणुक काढली. विजयोत्सव साजरा केला. 


या निवडणूकीत मात्र राष्ट्रवादी पक्षात मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून आले.तसेच काही स्थानिक नेत्यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधातील पॅनलच्या विरोधात जावून बंड केले.


राष्ट्रवादी पक्षा विरुद्ध राष्ट्रवादी पक्ष एकमेकांसमोर भिडला असलेला दिसला.यामुळे पुढच्या निवडणूकीत असेच गट -तट ,मतभेद राहिले तर पुढे होणाऱ्या मोहाडी तालुक्यातील  ग्रामपंचायत निवडणुका ,विधानसभा निवडणूकीत या राष्ट्रवादी पक्षातील द्वंद्वाचे प्रतिबिंब उलटे पडले असल्याचे दिसतील. उशीर होण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांनी या द्वंद्वाचा बिमोड करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजेत अशी प्रतिक्रिया काही राष्ट्रवादी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !