जुनी पेन्शन संपात सहभागी कर्मचाऱ्यांना सीईओने बजावली नोटीस - विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई.

जुनी पेन्शन संपात सहभागी कर्मचाऱ्यांना सीईओने बजावली नोटीस - विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई.


एस.के.24 तास 


गोंदिया : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीला घेऊन १४ मार्चपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपावर अद्यापही तोडगा न निघाल्याने १४ मार्च पासून काल शुक्रवारी १७ मार्च ला सुध्दा शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच होता. बेमुदत संपात सहभागी झालेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४७०० कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासनाने गुरुवारी नोटीस बजावली. संपात सहभागी होऊन कार्यालयात अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याने नियमाचा भंग झाला असून संप बेकायदेशीर आहे. त्यामुळे २४ तासात खुलासा सादर करून कार्यालयात रुजू न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा बजावलेल्या नोटीसा मधून दिला आहे. 


कर्मचाऱ्यांनी कडकडीत बंद पाळल्याने शुक्रवारी विविध कार्यालयांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते. जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध कर्मचारी सहभागी झाले आहेत.पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाज कोलमडले. कृषी,शिक्षण,समाजकल्याण,भूमिअभिलेख, सामाजिक,महसूल यासह सर्वच शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे कामचलाऊ कामकाज काही प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.


परंतु,महत्त्वाच्या सर्व टेबलवरील फायलींचा खच पडून आहे. त्यातच मार्च एंडिंग सुरू असल्यामुळे निधी योजनेचे काम सुरू आहेत. परंतु सुरू असलेल्या कामांना सुद्धा कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका बसला आहे. - उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद गोंदिया - नरेश भांडारकर

जिल्हा परिषदेच्या ४७०० कर्मचाऱ्यांना नोटिसा जारी केल्या.विहित मुदतीच्या आत खुलासा सादर केला नाही तर, शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !