पिंपळगाव (भोसले) येथील कन्या प्रेरणा नानाजी मेश्राम (छत्तीसगडची सौ.प्रेरणा खापर्डे) हिने बल्गेरिया येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या दोन बक्षीसावर कोरले भारताचे नाव.


 पिंपळगाव (भोसले) येथील कन्या प्रेरणा नानाजी मेश्राम       (छत्तीसगडची सौ.प्रेरणा खापर्डे) हिने बल्गेरिया येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या दोन बक्षीसावर कोरले भारताचे नाव.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक : २९/०३/२३ रघुजी भोसले यांचे वास्तव्य असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथे जन्म घेतलेल्या प्रेरणा नानाजी मेश्राम व हल्ली सौ.प्रेरणा खापर्डे या नावाने छत्तीसगड रायपूर येथील रहिवासी असलेली प्रेरणा हिने संपूर्ण भारतीयांची प्रेरणा घेऊन युरोपियन देशातील बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे झालेल्या मिस युनिव्हर्स च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन बक्षिसांचे किताब जिंकून भारताची ,चंद्रपूर जिल्ह्याची, ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले )ची ताठ मान युरोपियन देशाच्या भूमीत हिमालया प्रमाणे उंच केली आणि इतिहासाच्या पानावर जन्मभूमी पिंपळगाव (भोसले).भारताचे नाव कोरले.


 मिस युनिव्हर्स दोन किताबांचा बहुमान मिळवून भारतातील रायपूर येथील विमानतळावर पोहोचताच सौ.प्रेरणा खापर्डे हिचा विमानतळापासून तर तिच्या तालपुरी निवासस्थाना पर्यंत पुष्पवृष्टी व ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.प्रेरणाचे वडील महाराष्ट्र विद्यालय,पिंपळगाव (भोसले) येथुन शिक्षक म्हणून  सेवानिवृत्त झाले आहेत.


 तिचा विवाह छत्तीसगड येथील डॉ.खापर्डे यांच्यासोबत झाला आणि त्या ठिकाणी ती राहत आहे.तिचे प्राथमिक शिक्षण ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) झाले तर पदवीपर्यंतचे शिक्षण डॉ .बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे झाले.तिने मिळविलेल्या या मिस युनिव्हर्स किताबा बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात असून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !