स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम अंतर्गत मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे मेगा कब्बडी स्पर्धाचे आयोजन.

स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम अंतर्गत मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे मेगा कब्बडी स्पर्धाचे आयोजन.


एस.के.24 तास


मुल : दिनांक 13 मार्च 2023 रोजी सकाळी 11.30  वाजता कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम अंतर्गत मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन च्या सहकार्याने मेगा टुर्नामेंट कब्बडी स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या मध्ये मुल तालुक्यातील नवभारत कन्या शाळा मुल व कृषक विद्यालय सुशी,पोंभूर्णा तालुक्यातील साई कृपा विद्यालय चिंतलधाबा,राजुरा तालुक्यातील गुरूनानक विद्यालय विरूर स्टेशन, साईकृपा हायस्कूल चुनाळा, कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठाळा कोरपना या तालुक्यातील शाळेतील मुलींच्या कब्बडी स्पर्धेत 72 मुलींनी जिल्हा स्तरावर भाग घेतला.



कॅडबरी डेअरी मिल्क ने" गुड लक गर्ल" स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम गेल्या वर्षभरात राबवून 10000 हजार मुलींना कबड्डी व क्रिकेट खेळाचे सत्र घेऊन मुलींना कोचिंग केलं. त्या द्वारे तालुका स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.त्यामध्ये जे संघ विजयी झाले त्यांना पुढे जिल्हा स्तरावर संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


आज चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे तालुका क्रीडा अधिकारी चंद्रपूर मा जयश्री देवकर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले तसेच मा. प्रशांत लोखंडे सर यांनी महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले व स्पर्धेचे उद्घाटन केले. 


यावेळी सहा कब्बडी संघाच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रथम क्रमांक नवभारत कन्या विद्यालय मुल यांनी पटकावला. त्यांना मा.प्रशांत लोखंडे सर जिल्हा वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या हस्ते आकर्षक चषक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.द्वितीय क्रमांक कृषक विद्यालय सुशी तालुका मुल यांनी पटकावला त्यांना मा. नितीन उपगन्लावार कमर्शियल ऑफिसर मॅजिक बस चंद्रपूर यांच्या हस्ते आकर्षक चषक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.


तृतीय क्रमांक गुरूनानक विद्यालय विरूर स्टेशन राजुरा तालुक्यातील शाळेतील मुलींनी पटकावला त्यांना मा. संदीप राऊत सर ट्रेनिंग मॅनेजर यांच्या हस्ते आकर्षक चषक पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.या सर्व कबड्डी स्पर्धा मध्ये उत्कृष्ट चढाई म्हणून कु रोहीणी गेडाम हिला मा. संदीप राऊत सर प्रशिक्षक अधिकारी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या हस्ते आकर्षक चषक पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.


तसेच उत्कृष्ट पकड म्हणून कु मानसी कस्तुरे हिला मा प्रविण देसाई सिनियर क्लार्क जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर यांच्या हस्ते आकर्षक चषक पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट लीड अरूण मोहिते यांनी केले तसेच सर्वांनी चांगले सहकार्य केले.त्याबद्दल आभार मानले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !