असाही एक वाढदिवस : सरपंच नंदकिशोर वाढई यांनी चक्क स्मशानभूमीत श्रमदान करून साजरा केला वाढदिवस.
एस.के.24 तास
राजुरा : (राजेंद्र वाढई) राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत श्रमदान करून साजरा केला. नंदकिशोर वाढई हे उपक्रमशील, सुधारणावादी विचार आणि कृती अमलात आणणारे असल्याने त्यांनी आपला वाढदिवस हा गावातील स्मशानभूमीत श्रमदान करून साजरा केला. कळमना येथील ऑक्सिजन पार्कमध्ये श्रमदान केले. मानवी जीवनासाठी ऑक्सिजन हा महत्त्वपूर्ण घटक आहे. करोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व काय हे लोकांना समजले आहे. त्यामुळेच सरपंच वाढई यांनी दूरदृष्टी ठेवून कळमना येथे ऑक्सिजन पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. तिथे लावलेल्या फुल, फळझाडांच्या देखभालीचे उत्तम नियोजन केले असून वाढदिवसानिमित्त कुठेही बडेजाव न करता अन्य कार्यक्रमाला बगल देत ऑक्सिजन पार्क मध्ये श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या उपक्रमाबाबत अनेकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच,अ.भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांचा स्मशानभूमी येथे कृष्णाजी भोयर भोई समाजाचे नेते तथा विभागीय सरचिटणीस नागपूर यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सरपंच वाढई यांनी सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले की, गावातील स्मशानभूमीत श्रमदान करून ऑक्सिजन पार्क मधील वनराई सोबत वाढदिवस साजरा करण्यात मला आनंद आहे. सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते कृष्णाजी भोयर येथे येऊन शाल व श्रीफळ देऊन माझा सत्कार केला हा अविस्मरणीय अनुभव आहे. गाव, परिसरातील लोकांसाठी सदैव सेवा कार्य करेल अशा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई,माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने,ग्रा.प.सदस्य दिपक झाडे,धोपटाळा माजी सरपंच राजुभाऊ पिपळशेंडे, उपसरपंच कौशल्य कावळे,ग्रा.प.सदस्य सुनिता उमाटे,रंजना पिंगे, मुख्याधापक धानकुटे सर, पेदोर सर, ग्रामसेवक नारनवरे, गोखरे मॅडम, दुधे मॅडम, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक पिंगे,महादेव आंबिलकर, संगीता उमाटे,मिना भोयर, कल्पना क्षिरसागर,भंजन मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल वाढई,देवराव ताजने, पुरुषोत्तम आत्राम,
देवानंद आंबिलकर,दत्तू कुकडे, संदीप गिरसावळे, मनोहर कावळे, मारुती वाढई, सुभाष वाढई,गंगाधर पेंदोर,भाऊराव चापले, महादेव उमाटे, शंकर ताजने ज्ञानेश्वर बोढे, राजेश गिरसावळे, जि प उच्च प्राथ शाळेचे विद्यार्थी, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे,समस्त नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते.