भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष,वामन मेश्राम यांचे पालांदुरात भव्य स्वागत.



भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष,वामन मेश्राम यांचे पालांदुरात भव्य स्वागत.

 

एस.के.24 तास


भंडारा : (नरेंद्र मेश्राम) भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे  पालांदूर येथे भव्य स्वागत करण्यात आले. भंडारा गोंदिया युनिट तर्फे लाखनी येथे आयोजित कार्यक्रमात ' ई. व्ही. एम. हटाव ; देश बचाव ,संविधान बचाव; देश बचाव तसेच OBC ची जनगणना ' या विषयावर  वामन मेश्राम   आज सायंकाळी सभेला  मार्गदर्शन करणार आहेत.


पालांदूर येथे मेश्राम साहेबांच्या स्वागतासाठी आर.सी.फुल्लूके,हरिश्चंद्र लाडे,दिलीप शेंडे, ज्ञानेश्वर शेंडे,विमल फुल्लूके,शुद्धलेखा रामटेके, पुष्पा मेश्राम,वनिता शेंडे,प्रल्हाद शहारे,नरेंद्र मेश्राम,अनिल देशपांडे, उके कोलारी,मुकुंद हुमने,महेश कोचे प्रामुख्याने उपस्थित होते.


याप्रसंगी मेश्राम साहेबांना पुष्पहार घालून व  त्यांच्या  नावाच्या व संघटनेच्या जय जय काराच्या घोषणा देऊन भव्य स्वागत करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !