गिरीशबाबू खोब्रागडे यांची जयंती साजरी.

गिरीशबाबू खोब्रागडे यांची जयंती साजरी.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : अमरदीप लोखंडे) दिनांक,१८/०३/२३ आंबेडकरी क्रांतीचे सजक सेनानी तथा रिपब्लिकन पक्ष खोरीपा चे सरचिटणीस दिवंगत गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या ८४ वा जयंती कार्यक्रम सरसेनानी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे मेमोरिअल ट्रस्ट ब्रम्हपुरी. व रिपब्लिकन पक्ष खोरीपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.देवेश कांबळे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रम्हपुरी हे होते.


प्रमुख अतिथी म्हणून श्री जीवन बागडे   रिपब्लिकन पक्ष खोरीपा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश , माजी प्राचार्य के. डी.मेश्राम , प्राचार्या  रीमा कांबळे ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल, प्रा.डॉ. स्निग्धा कांबळे,डॉ.मिलिंद रंगारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.


प्रथमतः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर , बॅ. राजाभाऊ खोब्रागडे आणि गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  या प्रसंगी मान्यवरांनी गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या आंबेडकरी चळवळीतील आणि रिपब्लिकन पक्षातील त्याचे कार्य,त्याग ,निष्ठावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत डांगे तर उपस्थितांचे आभार पद्माकर रामटेके यांनी मानले. 


कार्यक्रमाकरीता इंजी.मिलिंद मेश्राम,नरेश रामटेके,प्रमोद मोटघरे,जयंत चहांदे,विजय वालदे,विजय पाटील,देवानंद कांबळे,डॉ.धम्मपाल फुलझेले,सचिन खोब्रागडे,परचाके सर,प्रेमसागर रामटेके,राहुल सोनटक्के,त्याच बरोबर सरसेनानी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे मेमोरिअल ट्रस्ट ब्रम्हपुरी. व रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !