जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी निवासी अध्ययन केंद्राचा शुभारंभ.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी निवासी अध्ययन केंद्राचा शुभारंभ.


एस.के.24 तास


उमरेड : दि.8 मार्च: आज जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ब्राईटएज फाउंडेशन,भिवापुरचे वतीने विद्यार्थिनींसाठी निवासी अध्ययन केंद्राचा शुभारंभ दिनांक 8 मार्च 2023 रोजी उमरेड येथे सुरू करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल, आदिम माना जमात मंडळाचे तालुकाध्यक्ष अरुण घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते गिरिधर घरतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

फाउंडेशनच्या वतीने भिसी येथे मुलांसाठी निवासी मॅजिक अध्ययन केंद्र सुरू आहे.याच धर्तीवर मुलींसाठी सुद्धा अशाच पद्धतीचे निवास हे केंद्र सुरू व्हावे अशी समाजबांधवांची इच्छा होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गरीब व होतकरू मुलींसाठी निवासी अध्ययन केंद्राची सुरुवात उमरेड येथे करण्यात आली. या केंद्रामध्ये सुरुवातीला सहा विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.


असून यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था मिलिंद नन्नावरे यांच्या घरी करण्यात आली आहे. तर अभ्यासाची सुविधा डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे करण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ.रमेशकुमार गजबे यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी 'विद्यार्थिनींना नैतिकता जपली तर सर्व संकटावर मात करता येवून आपले ध्येय पूर्ण करता येते. मी युवा अवस्थेत असताना निराधार मुलांसाठी जीवनभर काम करावे,असा निर्धार केला होता. 


परंतु नेहमीच्या संघर्षाने ते स्वप्न पूर्ण झाले नाही. परंतु मॅजिकच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण होताना दिसून येत आहे याचे फार मोठे समाधान वाटते. इथे निवड झालेल्या मुलींनी इतर गोष्टीकडे लक्ष न देता स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष द्यावे व नाउमेद न होता अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.


याप्रसंगी अरुण घरत यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला. सोबतच शंकर दडमल यांनी मनोगत व्यक्त करताना मुलींना समाजाची शान वाढवा. समाजाची मान झुकेल असे वर्तन करू नका, असा सल्ला दिला. 


सोबतच महिला दिनानिमित्ताने उमरेडच्या माजी नगरसेविका अर्चना राजू बगडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षिका योगिता सुधाकर दडमल मॅजिक उपक्रमाचे कौतुक करत उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सुधाकर दडमल, राजू बगडे, विनायक हनवते,सुनील मुंढरे,प्रभाकर ढोके, गोपाल गुडदे,मधुकर वाघ,संदीप चौधरी, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना वरोराचे सचिव प्रफुल्ल भरडे,प्रदीप श्रीरामे व समाज बांधव तथा महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन चंदू सावसाकडे, प्रास्ताविक ब्राईटएज फाऊडेशन चे अध्यक्ष श्रीकांत एकुडे तर आभार पूजा बारेकर यांनी मांडले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !