विहिरीत उडी घेऊन केली विद्यार्थ्याने आत्महत्या.
एस.के.24 तास
मुल :(नितेश मँकलवार) मुल तालुक्यातील नांदगांव येथील इयत्ता अकरावी मध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्यांने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी उघडकीस आली.श्रीकांत राजेंद्र हरडे (17) असे मृतक विद्यार्थ्यांचे नांव असुन तो इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत होता.बोंडाळा बुज रूक परीसरातील बांबोळे यांच्या शेतात विहीरीचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर विहीरीचे बांधकाम सुरु असल्याने सध्या विहीरीत मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामूळे दोन दिवसांपासुन सदर विहीरीचे बांधकाम बंद होते.
आज संध्याकाळी शेतमालक बांबोळे विहीर बांधकाम पाहण्यासाठी गेले असता विहीरीत प्रेत आढळुन आले. लागलीच त्यांनी सदर घटनेची माहीती पोलीस स्टेशन मूल अंतर्गत असलेल्या बेंबाळ पोलीस दूरक्षेत्र येथे दिली.वृत्त लिहेपर्यंत मृतक श्रीकांतचे पार्थीव विहीरी बाहेर काढणे सुरु होते. मृतक श्रीकांत हरडे दोन दिवसांपासुन बेपत्ता होता.
श्रीकांतच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. त्याचे पश्चात आई वडील आणि बहीण आहे. पुढील तपास ठाणेदार,सुमीत परतेकी करीत आहेत.