मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर, समुदाय समन्वयक सत्कार सोहळा संपन्न.


 

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर, समुदाय समन्वयक सत्कार सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक 14/03/2023 रोज मंगळवार ला सिद्धार्थ हॉटेलं चंद्रपूर,येथे मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर (शिक्षण विभाग)द्वारा समुदाय समन्वयक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या समारंभाला  चंद्रपूर आणि बल्लापुर तालुक्यातील सर्व समुदाय समन्वयकांनी उपस्थिती दाखवली.चंद्रपूर जिल्ह्यातील ऐकून नऊ तालुक्यामध्ये मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे खेळातून जीवनकौशल्ये हा उपक्रम नित्यनियमाने सुरू आहे या उपक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी समुदाय समन्वयक यांचा महत्वाचा वाटा आहे.


सोबतच जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा राबविण्यात आलेल्या शिक्षणदान उपक्रमात सुद्धा मॅजिक बस समुदाय समन्वयकांनी मौलाचे सहकार्य करून त्यांच्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणदान केले. या अनुषंगाने समुदाय समन्वयक यांचं कौतुक करून त्यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.


यादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  चंद्रपूर आणि बल्लारपूर तालुक्यातील सर्व समुदाय समन्वयक याना प्रमानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, सोबतच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आणि नेहमी मॅजिक बस उपक्रमाला सहकार्य करीत असलेले चंद्रपूर तालुक्याचे गट विकास अधिकारी स.मा. आशुतोष सपकाळ सर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच ज्यांचा मार्गदर्शनातून हा कार्यक्रम उदयास आला.


असे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी स.मा. प्रशांत लोखंडे सर यांचे सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व समुदाय समन्वयकांना आपल्या मार्गदर्शनातून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे प्रोत्साहन वाढविले.या सोबतच समुदाय समन्वयक यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व समुदाय समन्वयकांनी सहभाग घेतला.


सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स.मा.प्रशांत लोखंडे सर (वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर),कार्यक्रमाचे उद्घाटक स.मा. आशुतोष सपकाळ सर(गट विकास अधिकारी पं.स.चंद्रपूर)प्रमुख अतिथि म्हणून स.मा.धनपाल फटिंग सर(विस्तार अधिकारी पं.स.चंद्रपूर) प्रमुख पाहुणे स.मा. संदीप राऊत सर (जिल्हा प्रशिक्षक मॅजिक बस चंद्रपूर),अरुण मोहिते सर (तालुका समन्वयक मॅजिक बस चंद्रपूर), योगिता सातपुते मॅडम (ट्रेनिंग मॉनिटरिंग ऑफीसर मॅजिक बस गडचिरोली) हे उपस्थित होते. 


या कार्यक्रमाची धुरा बल्लारपूर तालुका समन्वयक मा.नितेश मालेकर सर आणि चंद्रपूर शाळा सहाय्यक अधिकारी मा.संदेश चुनारकर यांनी सांभाळली,कार्यक्रमाचे संचालन पायल राजपूत(शाळा सहायक अधिकारी) यांनी केले,तसेच चंद्रपूर आणि बल्लारपूर तालुक्यातील शाळा सहाय्यक अधिकारी प्रगती पाल,नालंदा बोथले,गणेश दुधबळे,गंगाधर जाधव,प्रियंका ठमके, हंसराज खंडाते यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !