श्रावस्ती बूध्दविहार दाबगाव मक्ता लोर्कापण तथा बूध्दमूर्ति स्थापनेच्या पहिल्या वर्धापन साजरा.
एस.के.24 तास
मुल : (राजेंद्र वाढई) दिनांक 26/3/23 ला श्रावस्ती बूध्दविहार दाबगाव मक्ता लोर्कापण तथा बूध्दमूर्ति स्थापनेच्या पहिल्या वर्धापन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.योगीता निलेश गेडाम सरपंच दाबगाव मक्ता तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.तूळशीराम कूंभारे सामाजिक कार्यकर्ते, मा.श्याम गेडाम सामाजिक कार्यकर्ते,मा.लोकचंद भसारकर ग्रामसेवक चिमूर पंचायत समिती,मा.यूवराज गेडाम शिक्षक मूल,मा.यूवराज दूर्गे सामाजिक कार्यकर्ते मूल, उध्दवजी अवताडे माजी अध्यक्ष बौद्ध महासभा दाबगाव मक्ता,मा.सूनील गेडाम अध्यक्ष बौद्ध महासभा दाबगाव मक्ता,कालीदास वाळके सचीव बौद्ध महासभा दाबगाव मक्ता, ब्रम्हदास तावाडे माजी सचीव बौद्ध महासभा दाबगाव मक्ता,दिलीप गेडाम दाबगाव मक्ता मंचावर उपस्थित होते.
ध्वजारोहण तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पाहूण्याचे स्वागत रमाई महिला मंडळ च्या उपासीकांनी बहारदार स्वागत गीत सादर करून केले... मान्यवरांनी उपस्थित जनसमुदाय बौद्ध धम्म आणि जिवन जगताना त्याचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनातून समजावून सांगितले... उपस्थित उपासिकां कडून भिमगीत सादर करण्यात आले..या सांस्कृतिक कार्यक्रमाला हार्मोनियम मा.लोकचंद भसारकर ग्रामसेवक चिमूर, तबलावादन अक्षय गेडाम सूशी यांनी साद दिली. आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी मेंढे सचीव रमाई महीला मंडळ दाबगाव मक्ता यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपा बंडू उराडे उपाध्यक्ष रमाई महीला मंडळ दाबगाव मक्ता यांनी केले.
भोजनदानानी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध महासभा तसेच रमाई महीला मंडळ दाबगाव मक्ता च्या उपासक आणि उपासीका यांनी सहकार्य केले.