मुल तालुक्यातील बोंडाळा येथे शेतकर्यांची आत्महत्या.
◆ विदर्भात शेतकऱ्याचा आत्महत्याचा सत्र सुरूच.
एस.के.24 तास
मुल : (नितेश मँकलवार) विदर्भातील चंद्रपूर जिल्हात तालुक्यातील मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दुरुक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोंडाळा येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आज दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जीवनदास नोमाजी पाल वय,45 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन,कर्जापाई बेजार झालेल्या या शेतकऱ्याने जमीन विकली होती.बँकेच्या कर्ज असल्याने तो मार्च अखेर कसा भरावा या विवंचनेत त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असावा असे बोले जात आहे. घराच्या मागील शेतात आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा नववा वर्ग,एक मुलगी सातवा वर्ग,आई,भाऊ असा आप्त परिवार आहे.मुलाचा नुकताच नवोदय विद्यालयाकरिता नंबर लागला आहे. मात्र मुलाचे यश पाहण्याचे भाग्य या शेतकऱ्याला मिळाले नाही.
पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुल येथे पाठविले आहे. पुढील तपास सुरू आहे.