घर व पाणीपट्टी करमुक्त व्हा,मोफत सुद्ध पाणी मिळवा ; ग्रामपंचायत जेवनाळा अभिनव उपक्रम.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : ग्रामविकासाचा केंद्र बिंदू असलेलीली ग्रामपंचायत ही गावातील जमा होणाऱ्या करावर विविध विकास कामे करत असते मात्र अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या घर व पाणीपट्टी करामुळे ग्रामपंचायत अंतर्गत होणारे विकास कामे ही प्रभावित होत असतात यामुळे जेवनाळा ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी नविल शक्कल लढवत चक्क करमुक्त व्हा व जल शुध्दीकरण केंद्रातील पाणी मोफत मिळावा हा अभियान सुरू केला आहे.
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील ग्रामपंचायतीने नागरिकांना पिण्यासाठी सुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने जल शुध्दीकरण केंद्र सुरू केला आहे.यामध्ये गावातील नागरिकांना वाजवी दरात शुद्ध पाणी पुरवठा केला जातो.त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही.
मागील महिन्यात घर व पाणीपट्टी कर थकबाकी असलेल्या कुटुंबावर कोर्टाकडून नोटीस देण्यात आले होते.त्यामुळे नागरिकांना कर भरण्यासाठी प्रेरित करण्यासाठी ग्रामपंचायत जेवनाळा कडून करमुक्त झालेल्या कुटुंबांना जलशुध्दीकरण केंद्रातील रोज 20 लिटर पाणी मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात गावातील नागरिक करमुक्त होऊन या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत.यामुळे ग्रामपंचायतीला ही नरिकाना सुद्ध पणी पुरवठा करणे हे उद्दिष्ट पूर्ण करता येत आहे.या उपक्रमातून व ग्रामपंचायत च्या प्रयत्नातून आता पर्यंत 85% टक्के कर वसुली करण्यात आली असून उर्वरित कर दात्याना कर भरण्याचे आव्हाहन करण्यात येत आहे.यामुळे नागरिकही प्रेरित होत कर भरताना दिसत आहेत.
चालू वर्षातील कर भरल्यास पुन्हा दोन महिने सुट.
गावातील नागरिकांनी थकीत असलेले घर व पाणीपट्टी कर भरावे या साठी नागरिकांना प्रेरित केले जात आहे.या साठी ज्या कर्दात्यानी चालू वर्षातील कर एप्रिल महिन्यात भरल्यास त्यांना पुढील दोन महिने जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी मागील योजने प्रमाणे देण्यात येणार आहे व यात मिळणारी 5% सूट याचाही लाभ नागरिकांना घेता येणार त्यासाठी नागरिकांनी आपले कर वेळेवर भरून गाव विकासात योगदान देण्याचे आव्हाहन ग्रामपंचायत जेवनाळा कडून करण्यात येत आहे.
गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने जलशुध्दीकरण केंद्र सुर करण्यात आले आहे. व या मध्ये कर भरणाऱ्याना एकमहिना प्रतिदिन वीस लिटर पाणी मोफत देण्यात येत आहे.यात नागरिकांनी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा.
वैशाली विनायक बुरडे.सरपंच जेवनाळा.