प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शाखा प्रमुखांचां सत्कार.
एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम) जिल्ह्यातील लाखनी तालुका मधील कनेरी(दगडी). येथे जागतिक महिला दिनाचे औवचित्य साधून प्रहार जनशक्ती पार्टी च्या जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे यांनी ग्रामीण भागातील जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय सहभाग मिळावं म्हणून सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला.
या वेळी ग्रामपंचायत कनेरी/द. येथे ग्रामपंचायत च्या वतीने विवीध कार्यक्रमात प्रशिक्षण शिबिर, दारूबंदी उपक्रम,आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,सदर कार्यक्रमाला रक्तदान शिबिराचे आयोजन शाखा प्रमुख सोपान झलके यांनी सुरळीत व जबाबदारीने यशस्वीरीत्या पूर्ण केले.या प्रसंगी एकुण पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केलेल्यांना थरमास पाणी बाॅटल प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा च्या वतीने देण्यात आले.
ग्रामपंचायत सरपंच लता शेंडे, उपसरपंच प्रदीप राघोर्ते, तंटामुक्ती अध्यक्ष,सचिन गोमासे, सोपान झलके प्रहार जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे ,शालीक बोरकर,पाटील,रेंगेपार चे राजेश मेश्राम,श्रीकांत वाढई शाखा प्रमुख सोपान झलके यांचे सन्मान चिन्ह देवून सत्कार केला.या प्रसंगी राहुल ठवकर,सतिश डाभरे,बालु सार्वे,जयंत मेश्राम,सचिन गोमासे प्रविण डाभरे,भुपेश शेंडे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इत्यादींने सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पार्टी चे पदाधिकारी व प्रहार सेवक पुरुष व महिला मंडळी उपास्थित होते.