क्रांतीज्योती सावित्रीबाई महिलांचे खरे प्रेरणास्रोत. - प्राचार्य,डॉ.डी.एच.गहाणे.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,११/०३/२३सावित्रीबाई फुलेंनी स्वतः हालअपेष्टा सहन करुन मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.महात्मा जोतिबांनी सावित्रीबाईच्या खांद्याला खांदा देत विरोधकांना धडा शिकवला.या संधीमुळे आज महिला प्रगतीपथावर गेलेल्या आपल्याला दिसत आहेत,त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई महिलांच्या ख-या प्रेरणास्रोत होत,असे विचार प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणेंनी मांडले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे माल्यार्पण करुन करण्यात आली.उपस्थित डॉ राजेंद्र डांगे, डॉ असलम शेख, डॉ किशोर नाकतोडे,डॉ रतन मेश्राम,डॉ दर्शना उराडे,अधीक्षक संगीता ठाकरे,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर इ.नी पुष्प अर्पण अभिवादन केले.संचालन डॉ युवराज मेश्राम तर आभार डॉ धनराज खानोरकरांनी मानले.