मोरवा शिबिरात केली तांत्रिक मेंटेनन्सची निःशुल्क कामे : औ.प्र.संस्थेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.

 


मोरवा शिबिरात केली तांत्रिक मेंटेनन्सची निःशुल्क कामे  : औ.प्र.संस्थेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांचे व्दारा  आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विशेष श्रम संस्कार शिबिर जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले.मेंटेनन्सची कामे, स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच  झाडीबोली साहित्य मंडळाच्या सहकार्याने   हनुमान मंदिर चौकात " कामगार आणि शेतकऱ्यांच्या कविता "  या शीर्षकांतर्गत कवीसंमेलन आयोजित करण्यात  आले होते.


विशेषत.आय.टी.आय चे  माजी विद्यार्थी तसेच शिबिरार्थी  प्रशिक्षणार्थ्यांना या कविसंमेलनात स्थान दिले होते.या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक  बंडोपंत बोढेकर होते.तर रासेयोचे कार्यक्रम अधिकारी नामदेव गेडकर,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक कवी अनिल आंबटकर,ज्येष्ठ कवयित्री शशीकला गावतुरे (मुल) यांची उपस्थिती होती.


 सहभागी कवी म्हणून गझलकार सुनील बावणे (बल्लारपूर),संजय वैद्य (डब्लू.सी.एल ),पंजाबराव जाधव,स्वप्निल मेश्राम,संगीता  पिज्दूरकर ,सुनील इखारे,  पियुष ढाक, सुमित कांबळे  तसेच निवडक प्रशिक्षणार्थांनी आपल्या कवितेतून उपस्थित ग्रामस्थांचे  प्रबोधन  केले.  तसेच स्वच्छतेच्या कविता व  सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या स्वरचित कवितांचे उत्तम सादरीकरण करत  जनप्रबोधनात्मक  कवी संमेलन गाजवले.


सुनील बावणे (बल्लारपूर )यांच्या  सूत्रसंचा़लनाने  संमेलन आकर्षक झाले.तर अध्यक्षांच्या बिबट्या या कवितेनेे झाडीबोली साहित्यातील गोडवा‌ अधोरेखित झाला.कार्यशाळेच्या स्वरूपात घेतल्या गेलेले प्रस्तुत संमेलन सहभागी शिबिरार्थ्यांना दिशा देणारे ठरले असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी याप्रसंगी केले.


  शिबिरातील मेंटेनन्सची कामे संपल्यानंतर समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य,रवींद्र मेहेंदळे,सरपंच सौ.  स्नेहाताई साव,मुख्याध्यापक अनिल आंबटकर, कार्यक्रम अधिकारी नामदेव गेडकर,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर,रासेयो सदस्य महेश नाडमवार, रमेश रोडे यांची उपस्थिती होती. 


या कार्यक्रमात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सुमित कांबळे, जाॅबाज कुरेशी,कु.रिया उपरीकर,संघर्ष नांदे,कार्तिक ठाकरे,हर्षल बडोले,आशिष गावतुरे,रूपल पिंपळकर, साहिल बुलबुले आदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .मुख्याध्यापक आंबटकर यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वर्षासाठी निमंत्रण दिले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल बडोले यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव गेडकर यांनी केले. प्लंबिंगची,वेल्डिंग,इलेक्ट्रिकल तसेच सिव्हिल मेंटेनन्स वर्कची कामे निदेशक महेश नाडमवार, रमेश रणदिवे, रामभाऊ लांडगे, बंडू Events, प्रभाकर हनवते,किशोर बोंबले,जितेंद्र बांबोळे, सुहास रामटेके,श्री.आसुटकर आदींनी शिबिरार्थ्यांच्या माध्यमातून केली.व्यायाम तथा दैनंदिन सामुदायिक प्रार्थना,ग्रामदिंडी  च्या आयोजनात बाबा पानघाटे,नामदेव आस्वले गुरूजी यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !