श्री.संताजी महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन.

श्री.संताजी महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन.


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय ,पालांदूर येथे पोलीस दिदी, पोलीस काका या पोलीस स्टेशन पालांदूर च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमात कायदेविषयक मार्गदर्शन देण्यात आले .दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप दहिकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्ही.एम.चहांदे तर अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गिरीश लांजेवार पोलीस कॉन्स्टेबल,माया हलमारे,डॉ.राजेंद्र खंडाईत प्रा.नितीन थूल,डॉ रमेश बागडे उपस्थित होते.  


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता नवनवीन तयार होणारे कायदे त्या कायद्याची ओळख  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. पोलीस आणि सामान्य व्यक्ती यातील दरी कमी होऊन समन्वय साधला गेला तर आपल्याला आपले जीवन अधिक सुखकर कसे करता येईल या संदर्भात कायद्याची आपणास कशी मदत होते ,कोणता कायदा कोणत्या ठिकाणी उपयोगाचा असतो या विषयावर समाजात घडणाऱ्या अनेक उदाहरणासहित आपले मत व्ही एम चहांदे, ठाणेदार पोलीस स्टेशन पालांदूर यांनी व्यक्त केले .तर महाविद्यालयीन जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनात कायद्याला किती आणि कसे महत्व द्यायला हवे त्याकरिता विद्यार्थ्यांनी कसे राहावे या संदर्भात प्रकाश प्राचार्य.डॉ. प्रदीप दहीकर यांनी टाकला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. संजयकुमार निंबेकर यांनी केले .तर उपस्थिताचे आभार डॉ. गिरीश लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जहांदर बख्त , जया कोडापे,कोमल सिंगनजुडे,अनिकेत ठवरे, तुषार सोनवणे,प्रगती,सेलोटे,कल्याणी कोरे, दिव्या मस्के या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !