दारू,सट्टा,वारु (होळी स्पेशल) श्री,अमरदीप प्रल्हाद लोखंडे सहसंपादक - एस.के.24 तास यांच्या लेखणीतून...

दारू,सट्टा,वारु (होळी स्पेशल)


श्री,अमरदीप प्रल्हाद लोखंडे                सहसंपादक - एस.के.24 तास  यांच्या लेखणीतून...


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : - दिनांक : ०७/०३/२३ 


दारू,सट्टा,वारू...

लोकांना सांगते मरू मरू...

मोठा सेठ होईन चोरु चोरु

घामाचे कष्ट म्हणे कायले करू..१


चने,चिवडा,पापड भुजला

खाता खाता जाग्यात निजला..

संगतीने त्याले खूप पाजला

बेवळा म्हणून मस्त गाजला...२


मासिक मानधन तोंड बंद

छापा मारी देखना छंद..

जाण्या येण्याचा मार्ग अरुंद

तस्करी धावते सुसाट बेधुंद...४


हल्ली सत्तेचा भरतो जुगार 

मोठ्या संख्येचे वेट बिगार

बायको म्हणते कोठाय पगार

आणला माल सामान उधार...३


सट्टा पट्टी ओपन नेट

एक ले दहा फिक्स रेट...

रात्री बारा वाच अॅंड वेट

एका दाण्याची हुकली भेट...५


फुकट तांदूळ नफाच नफा

विकून त्याले घरात झोपा....

काकलर,बॉयलर सामूहिक कापा

खाता खाता थापा वर थापा...६


खारट तिखट खाता खाता

खाता पेता राम जाता

काय होईल होता होता

समजणारच नाही मरता मरता..७


रंगाचा हा बाजार मांडला

फुटीरतेचा द्वेष सांडला....

हक्कासाठी न्याय भांडला

राजाने त्यास उकरात कांडला...८

राजाने त्यास उकरात कांडला...


  श्री,अमरदीप प्रल्हाद लोखंडे          

        श्री,अमरदीप प्रल्हाद लोखंडे                               सहसंपादक - एस.के.24 तास                       मु.पो : अ-हेरनवरगाव तालुका : ब्रह्मपुरी         जिल्हा : चंद्रपूर  मो.नं : - ८३०८००५८६८

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !