आरमोरी येथील श्री.विकास भैसारे यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार 2022 ने सन्मानित.
एस.के.24 तास
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ व मलेशियातील डॉ.आंबेडकर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक,4 व 5 नोव्हेंबर 2022रोजी मलेशियात दुसरें आंबेडकरवादी विश्च साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या एतीहासिक संमेलनात विविध देशातील साहित्यिक विचारवंत सहभागी झालेले होते त्या प्रिथ्यार्थ डॉ.आंबेडकर वेल्फेअर असोसिएशने मलेशिया च्यावतीने नागपूर येथे दि.26 मार्च 2023 ला हिंदी मोर भवन येथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा नववा वर्धापन दिन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षते खाली पर पडला.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील रहिवाशी साहित्यिक विचारवंत श्री.विकास (विक्किकुमार) भैसारे यांना त्यांनी साहित्य,संगीत व सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.अनिल काळबांडे,ऍड.भुपेश पाटील,प्रा. दिपककुमार खोबरागडे यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर राज्यस्थरिय पुरस्कार 2022 हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील साहित्यिक विचारवंत श्री विकास( विक्की कुमार) भैसारे यांना पुरस्कार मिळाल्याने हि गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरलेली आहे...या यशाचे श्रेय त्यांनी पत्नी,आई,वडील ,नागपूर येथील श्री.धनराज पाटील सर व मित्र परिवार यांना दिलेला आहे.