ब्रम्हपुरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रोजगार मेळाव्यात 112 जणांची रोजगारासाठी निवड.

ब्रम्हपुरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रोजगार मेळाव्यात 112 जणांची रोजगारासाठी निवड.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : दिनांक,०२/०३/२३ ब्रह्मपुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते.


या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन एम.आय.डी.सी.  असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी आर.पी.मेहंदळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गहाणे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्या येरमे,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश डांगे हे यावेळी मंचावर उपस्थित होते.


सदर रोजगार मेळाव्यात विविध नामांकित  कंपन्या सहभागी झाल्या होत्या.मेळाव्यात रोजगार मिळवण्यासाठी 362 सुशिक्षित उमेदवारांनी नोंदणी केली, व त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता संस्थेचे गट निदेशक श्री.के.एन. रावळे सर व संस्थेतील समस्त कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा हातभार लाभला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय सर यांनी तर आभार,रत्नदीप रामटेके सर यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !