गडीसुर्ला येथे,शाळा व्यवस्थापन समिती व सखी महिला ग्राम संघाच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा सुरू.0

गडीसुर्ला येथे,शाळा व्यवस्थापन समिती व सखी महिला ग्राम संघाच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा सुरू.


एस.के.24 तास


मुल : (राजेंद्र वाढई) गडीसुर्ला येथे,शाळा व्यवस्थापन समिती व सखी महिला ग्राम संघाच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात आली महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र येथिल कर्मचारी संघटना राज्यातील १ नोव्हेंबर २00५ रोजी नंतर नियुक्ती कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्च २०२३ पासून जुनी पेन्शन योजना सुरू करावी या करिता बेमुदत आंदोलन पुकारले आहे.

या बेमुदत संपामुळे शिक्षक शिकवायला येत नसल्यामुळे आणि मागील कोरोना काळात २ वर्षे वाया गेल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,आर्थिक, व गैरसोय होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे  पदाधिकारी, सखी महिला ग्राम संघाचे कर्मचारी यांच्या पुढाकाराने शाळा सुरू करण्यात आले.


 तसेच वर्ग  १ ते ७ पर्यंत विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले, सर्व विद्यार्थी उपस्थित होते शाळेला नेहमी मदत करणारे शा, व,समितीचे अध्यक्ष श्री,विनोद भाऊ कावळे,श्री महेश भाऊ आंबटकर,श्री,शेख महमदतकी,श्री,हरिभाऊ लेनगुरे,श्री, सचिन सोयाम,श्री,प्रीतम आकुलवार,ग्रा,प,स,सौ, सोनाली ताई शेंडे,सौ,निलोफर शेख,सौ,सीमा ताई आंबटकर,सौ,दीक्षा ताई मोहूर्ले,सौ,आचल आंबटकर, यांनी मेहनत घेतली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !