CSTPS मधील कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष,श्री.सुरज ठाकरे थेट मंत्रालयात.


CSTPS मधील कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष,श्री.सुरज ठाकरे थेट मंत्रालयात.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


चंद्रपूर : सविस्तर वृत्त असे की,आशिया खंडातील नावलौकिक असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील  " महा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र " (CSTPS) चंद्रपूर या कंपनीतील कामगारांविषयी तथा स्थानिक बेरोजगारांविषयी रोजगारा संदर्भात विविध समस्यांबाबत सदर कंपनीला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर काही समस्या मार्गी लागल्या तर काही  समस्या प्रलंबितच आहेत.


त्यातील काही अत्यंत महत्त्वाच्या प्रलंबित असलेल्या समस्या स्थानिक प्रशासनाकडून मार्गी लागल्या नसल्यामुळे अखेर " युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुरज ठाकरे " यांनी दिनांक,२२ फेब्रुवारी २०२३ ला मंत्रालय मुंबई येथे जाऊन युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री.रवीभाऊ राणा यांना सोबत घेऊन यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,गृह मंत्री तथा ऊर्जामंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन  त्यांना CSTPS चंद्रपूर येथील स्थानिक कामगारांच्या काही गंभीर समस्या मार्गी लावण्यास विनंती करताच यांनी तात्काळ माननीय डॉक्टर पी. अनबलगन (आयएएस) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती महाराष्ट्र. (प्रकाशगड,मुंबई ) यांना समस्या मार्गी लावण्याबाबत आदेश दिले. 


श्री.रवीभाऊ राणा व मा.मंत्री महोदय श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात श्री.सूरज ठाकरे यांनी दिनांक :२३फेब्रुवारी २०२३ ला माननीय डॉक्टर पी.अनबलगन यांची भेट घेवून चंद्रपूर महा औष्णिक विद्युत प्रकल्प (CTPS) मध्ये स्थानिकांना रोजगार तसेच स्थानिक होतकरू गरजू ठेकेदारांना काम देण्यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करून पुढील समस्या मार्गी लावण्यास विनंती केली.


समस्या क्र : - १)  CSTPS चंद्रपूर येथील युनिट क्रमांक- ८ व ९ मधील एकूण ४ कामगार विवेक इलेक्ट्रॉनिक्स चे काम करून सुद्धा बी.एम.एच टेक्नॉलॉजी चे काम करत होते. परंतु दोन्ही ठिकाणी कामे करून देखील त्यांना पगार फक्त एकाच ठिकाणी काम केलेल्या कामाचा दिला जात होता. या कामगारांनी हा बेकायदेशीर अन्याय तथा शोषण सहन करून देखील कुठलीही तक्रार न करिता आपले काम प्रामाणिकपणे केले.परंतु सद्यस्थितीत कंत्राट संपुष्टात आला असल्याचे कारण सांगून या कामगारांना तीन महिने आधी कामावरून काढले गेले.त्यामुळे कंत्राट जरी संपुष्टात आला असला तरी नवीन कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कामगारांना परत कामावर सामावून घेण्यात यावे अशी जिल्हाध्यक्ष श्री.सुरजभाऊ ठाकरे यांनी मंत्री महोदयांना  विनंती केली.


समस्या क्र. : - २)  चंद्रपूर शहरातील CSTPS मधील कॉम्प्रेन्सिव्ह मेंटेनन्स ऑफ हायड्रोजन ड्रायर अँड इन्स्ट्रुमेंट एअर ड्रायर इन्स्टॉल युनिट ८ व ९ मधील कंत्राटाच्या कामांमधील निविदेतील अटी व शर्ती कुठल्या एकाच कंत्राटदाराला मिळाव्यात अशा प्रकारे असल्याने या कामांमधील अटी व शर्ती शिथिल करून सदर काम हे विवेक इलेक्ट्रॉनिक्स नामक कंपनीलाच वारंवार मिळण्याऐवजी इतरही स्थानिक कंपनी निविदेमध्ये सहभाग घेवू शकतील तसेच विवेक इलेक्ट्रॉनिक्स यांना हे काम सद् स्थितीत मिळाले आहे तरी देखील सदर कंपनी ही गेल्या तीन महिन्यांपासून काम हस्तांतरण घेत नसल्याने नमूद कंपनीपासून हे काम काढून सदर कामाबाबत टाकलेल्या अटी व शर्ती शिथिल करून निविदा परत काढण्यासंदर्भात श्री. सुरज ठाकरे यांनी विनंती केली.


समस्या क्र. : - ३) CSTPS चंद्रपूर येथील कन्व्हेअर बेल्ट च्या कामाचा कंत्राटाची प्रक्रिया अजूनही पूर्ण न झाल्याने या कंपनीचा कंत्राट सदस्तीतीत भावना एनर्जी ग्रुप या कंपनीला ३ महिन्याचे एक्सटेन्शन वाढून दिला असल्याने ३ तीन महिन्यानंतर कामगार परत बेरोजगार होणार नाही याकरिता तात्काळ निवेद्य ची प्रक्रिया पूर्ण करून कामगारांना तात्पुरते कामावर ठेवून नंतर त्यांना कंत्राट नाही असे सांगून कामावरून काढण्याचा प्रकार थांबवण्याकरिता तथा कनवेयर बेल्ट मध्ये काम करत असलेल्या कामगारांना भावना एनर्जी कंपनी फक्त १५ दिवसांच्या ड्युट्या देऊन कामगारांवर अन्याय करीत आहे.हा अन्याय थांबवण्याकरिता कामगारांना महिन्यातून  नियमितपणे एकूण २६ ड्युटी देऊन स्थानिक बेरोजगार हा कामापासून वंचित राहिला नाही पाहिजे याकरिता आवर्जून मंत्री महोदयांना श्री. सुरज ठाकरे यांनी विनंती केली.


वरील सर्व समस्या तात्काळ मार्गी लावण्याकरिता माननीय डॉक्टर पी.अनबलगन (आयएएस) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती महाराष्ट्र यांनी श्री.सुरज ठाकरे यांना सकारात्मक उत्तर देत विश्वास दिला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !