चक्क देशी दारू च्या फवाऱ्याने धान पीक झाले झिंगाट.
नरेंद्र मेश्राम!प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : दारूमुळे होणारे दुष्परिणाम हे आपल्याला सर्वत्रच बघायला मिळतात मात्र भंडारा जिल्ह्यातील या पठ्याने चक्क धान पिकाच्या नर्सरीवर देशी दारूची फवारणी करत परह्याना रोगमुक्त केलं असल्याचे समोर आले आहे.
लाखनी तालुक्यातील जेवनाळा.येथील एका शेतकऱ्यानं दारूचा विधायक वापर केलाय. भातपिकावर फवारणीसाठी चक्क दारूचा वापर केलाय. फवारणीसाठी दारूचा वापर केल्यानं या फवारणीचा पिकाला फायदा झाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
परिसरात सध्या उन्हाळी धान रोवणी साठी असलेल्या नर्सरी ची देखभाल सुरू आहे. वातावरणातील धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धानाचे पऱ्हे हे पिवळे पडून कीडग्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे मात्र रामदास गोंदोळे या युवा शेतकऱ्याने शेतात फवारणी चक्क देसी दारूची फवारणी करत ते रोग मुक्त केले आहे. आता तुम्ही म्हणाल, फवारणीत काय वेगळं? पणं फवारणीत वेगळं काही नाही, फवारणीसाठी म्हणून वापरलं जाणारं किटकनाशक आगळं वेगळं आहे. हे किटकनाशक आहे देशी दारू,देशी दारूचा भातपिकावर फवारणीसाठी वापर केल्याचे सांगत आहेत उमेश गोंदोळे यांनी एक पंप फवारणी साठी देशी दारूची नव्वद मिलीची बाटली व सोबत एक पाव युरिया यांची फवारणी केल्याने धानाची रोपे ही टवटवीत झाली आहेत त्यामुळे पिकाची चांगली वाढ होऊन ते लवकरच रोवणी योग्य झाले आहेत.
कृषीविभागासाठी हा प्रयोग नवा नाही. पण कोणत्याही कृषी विद्यापीठानं पिकांवरील मद्यप्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. पण या मद्यप्रयोग परिणामकारक असल्याचं कृषी शास्त्रज्ञ सांगतात.
यू ट्यूब चा उपयोग करून घेतली माहिती : -
उन्हाळी धान पिकाची नर्सरी ही दरवर्षी गरव्यामुळे कोमेजून जात होते अनेक महागड्या औषधी फवारणी करून त्यांचा परिणाम पाहिजे तसा मिळत नव्हते या साठी रामदास गोंडोळे यांनी आपल्या मोबाईल मधील युट्यूब चा उपयोग करून देसी दारू फवारणी केल्याने पीक जोमात येत आल्याची माहिती घेतली व देसी दारू खरेदी करून फवारणी केली आणि मिळालेले परिणाम हे अचंबित करणारे होते फवारणी केल्यानंतर चार ते पाच सहा दिवसात धान पीक हिरवेगार झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आणि आता हा देसी जुगा ड. आता अनेक शेतकरी वापरताना दिसत आहेत.
धानाची नर्सरी ही थंडी वाढल्या मुळे पिवळी पडून तिची वाढ थांबली होती या साठी इतर फवाऱ्यान्या केल्या मात्र सुधारणा झाली नाही व देसी दारू व युरिया खताची फवारणी करायचं काही दिवसात नर्सरी हिरवीगार होऊन ते रोवनियोग्या झाले आहेत. - रामदास गोंदोळे,शेतकरी जेवणाळा