" व्यसनांची नशा घात करी प्रेमाची नशा साथ देई "
" जोडीदार मज निर्व्यसनीच हवा ”
एस.के.24 तास
गडचिरोली : व्यसन म्हणजे शत्रू प्रेमाचा कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन हे निव्वळ थोड्या वेळाची करमणूक,मानवी जीवनाचा पाया म्हणजे प्रेम,मनाचा व शरीराचा सुंदर बंध म्हणजे प्रेम, हेच बंध अडीअडचणीत दुःखात आधार ठरतात. व्यसन आधारापोटी कवटाळली जातात.
परंतू व्यसने ही आधार नाहीत, हे समजून घेतले पाहिजे. जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते त्यांच्या आयुष्यातील "प्रेमाची भक्कम आधार आपणांस ढासळताना दिसतो. त्यामुळेच व्यसनांची नशा घात करी व प्रेमाची नशा साथ देई. हे तरुणाईने लक्षात घेणे आवश्यक आहे.
जोडीदार व्यसनी असल्यास जन्माला येणारे मूल हे व्यसनी होण्याची शक्यता.
एक जोडीदार (४०%
दोन्ही जोडीदार (४००%
" यशस्वी प्रेम व सुखी विवाही जीवनासाठी जोडीदार निर्व्यसनीच निवडा " हा आमचा प्रेमळ आग्रह.
प्रेम म्हणजे परस्परांतील एकरुपता मानणे. म्हणजेच एकरुप होणे विचाराने,मनाने व शरीराने. एकदा एकरुपता साधली गेली की, प्रेम, विश्वास, समर्पण या गोष्टी आपसूकच निर्माण होतात, जाणवतात. व्यसनांचे एक कारण अनुवंशिकता हे सुध्दा आहे ज्याचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे.
दाम्पत्यापैकी जर एक जोडीदार व्यसनी असेल तर ४० टक्के शक्यता आहे की, जन्माला येणारे मूल हे व्यसनी होण्याची आणि जर दोन्ही जोडीदार व्यसनी असल्याने ही शक्यता ४०० टक्के असते.त्यामुळे निरागस भावी पिढीच्या भविष्यासाठी तसेच " यशस्वी प्रेम व भावी सुखी विवाही जीवनासाठी जोडीदार निर्व्यसनीच निवडा " हा आमचा प्रेमळ आग्रह.