एकात्मता शिक्षण संस्था,ब्रह्मपुरी तर्फे स्व.श्री अशोकजी सिंहल स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन.

एकात्मता शिक्षण संस्था,ब्रह्मपुरी तर्फे स्व.श्री अशोकजी सिंहल स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : दिनांक,09/02/2023 ब्रम्हपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका केंद्र.या ठिकाणी एकात्मता शिक्षण संस्थेची स्थापना झाली व हिंदू ज्ञान मंदिर नामक एक अद्वितीय प्रकल्प येथे उभा केला.इंग्लिश माध्यमाची शाळा पण त्यात भारतीय जीवनमूल्य रुजावे,राष्ट्रभक्ती रुजावी संस्कृतीचा अभिमान विद्यार्थ्या मध्ये वाटावा या दृष्टीने कार्यपद्धती तयार करण्यात आली. 


हिंदू ज्ञान मंदिराच्या वाढलेल्या या वट वृक्षाला ,मंदिराला आज छत्तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.  समाजातील सर्व स्तरातील 610 विद्यार्थी या ज्ञान मंदिरात शिक्षण घेत आहेत.एकात्मता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अशोक सिंहल यांचे देहावसान झाल्यानंतर सन 2016 पासून ब्रह्मपुरी येथे स्वर्गीय अशोक जी सिंहल स्मृती व्याख्यानमाला प्रारंभ झाली.


 विद्यार्थ्याचे पालक आणि नागरीक यांचे प्रबोधन व्हावे श्रद्धेय अशोकजिंनी ज्या विचारांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं तो विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा म्हणून ही व्याख्यानमाला प्रारंभ झाली. हे या व्याख्यानमालेचे सहावे वर्ष आहे.वक्तृत्वाला कृतीची जोड असावी म्हणून या व्याख्यानमालेत अनेक कर्तुत्ववान वक्ते लाभले.ही तीन दिवसीय व्याख्यानमाला दासनवमी ते विजयाएकादशी या कालावधीत होत असते यावर्षी ही व्याख्यानमाला दिनांक 14, 15 व 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजीत केलेली आहे.


 दिनांक.१४ फेब्रुवारी २०२३ ला प्राचीन भारतीय ज्ञानसंपन्न बहुजन समाज या विषयावर पद्मश्री मा. गिरीशजी प्रभुणे,पुणे,विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते वक्ते राहणार तसेच अतिथी तथा सत्कारमूर्ती पद्मश्री मा.परशुरामजी खुणे,गुरनोली, जेष्ठ नाट्यकलावंत उपस्थित राहणार आहे. 


दि. १५ फेब्रुवारी २०२३ ला स्वातंत्र्य चळवळीतील सुभाष पर्व या विषयावर मा. डॉ.कुमार शास्त्री, नागपूर प्रसिद्ध वक्ते,विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते वक्ते राहणार तसेच अतिथी मा.डॉ.डी. एच.गहाणे,प्राचार्य ने.हि.महाविद्यालय,ब्रह्मपुरी उपस्थित राहणार आहे. दि. १६ फेब्रुवारी २०२३ ला अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी,पिठाधीश्वर श्री रुक्मिणी विदर्भ पीठ,अंबिकापूर यांचे आशीर्वचन लाभणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्षेत्रीय मंत्री, विश्व हिन्दू परिषदेचे मा.श्री.गोविंदजी शेंडे, नागपूर तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रवचन व भागवतकार ह.भ.प.पूज्य. सविताताई खरवडे, ब्रह्मपुरी उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब कहारे यांचे सहस्र चंद्रदर्शन कार्यक्रम व सत्कार होणार आहे. 


गत पाच वर्षात जनतेनी आम्हास भरभरून प्रतिसाद दिला. यंदाही असाच प्रतिसाद आपणाकडून अपेक्षित आहे.आपण सर्वानी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !