ट्रक च्या धडकेत युवक ठार.

 


ट्रक च्या धडकेत युवक ठार.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गडचिरोली : लोह खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने मोटार सायकल  स्वार,MH - 33 P 3384 चेतन विस्तारी पोत्रजवार वय,22 वर्ष रा,काटली ता,जिल्हा,गडचिरोली ट्रक ने चिरडल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 6.45 वा.च्या  सुमारास सेमाना ते गडचिरोली मार्गावर असलेले सायन्स कॉलेज च्या समोर  घडली. 

प्राप्त माहितीनुसार,रविवारी दुपार च्या सुमारास गडचिरोली शहरानजीक च्या चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान येथे नवस कार्यक्रम असल्याने ते गेले होते. कार्यक्रम आटोपून गडचिरोली कडे परत येत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात त्याचा जागीच मृत्यू झाला.


अपघाता नंतर ट्रक चालक पसार झाला.घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.पोस्टमार्टम करण्यासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले.अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.


लोह खनिज प्रकल्प सुरजागड चे ट्रक भरधाव वेगाने गडचिरोली तुन जात असतात त्यांच्यावर वाहतूक नियंत्रण चे पोलीस अंकुश ठेवावे अशी मागणी परिसरातील जनता करीत आहे.


आज त्यांचा अंतिम संस्कार  3:00 वा.काटली येथे करण्यात येणार आहे अशी माहिती नातेवाईक कडून मिळाली...


शोकाकुल : - 

★ धनगर/कुरमार समाज बांधव,गडचिरोली/चंद्रपूर

★ एस.के.24 तास न्युज नेटवर्क

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !