सरपंच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदु असुन आपला गाव शास्वत व स्वयंपूर्ण करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन करावे. - माजी आमदार सुदर्शन निमकर

सरपंच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदु असुन आपला गाव शास्वत व स्वयंपूर्ण करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन करावे. - माजी आमदार सुदर्शन निमकर


एस.के.24 तास


चंद्रपूर : शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी धनोजे कुणबी समाज मंदीर,लक्षीनगर चंद्रपुर द्वारा चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजीत कृषी महोत्सवात सरपंच परिषद चे उद्घाटन माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधरराव मालेकर से.नि.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपुर,मा.जयंतदादा पाटील संस्थापक अध्यक्ष,अखिल भारतीय सरपंच परिषद,मा.प्रा.राजेंद्र कराळे जिल्हा अध्यक्ष,तथा राज्य सल्लागार,अ.भा.सरपंच परिषद,मा.रविंद्र शिंदे विधानसभा प्रमुख,शिवसेना,मा.खुशाल रामगिरवार राज्य प्रविण प्रशिक्षक,यशदा पुणे. मा.नंदकिशोर वाढई सरपंच तथा विदर्भ विभागीय महासचिव अखिल भारतीय सरपंच परीषद,मा. रणजित डवरे माजी उपसभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपुर,मा.अभिलाषा गावतुरे बालरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर, ॲड.कू.श्रुती सातपुते अशासकीय संघटन मंच दिल्ली च्या संघटक मंचावर उपस्थित होते.


सरपंच परिषदेत उद्घाटनीय मनोगतातून माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले की,सरपंच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदु असुन आपला गाव शास्वत व स्वयंपूर्ण करावा.केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पंचायत राज व ग्राम विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रात अनेक योजना राबवल्या जातात आपल्या गावाच्या शाश्वत विकासासाठी व गाव आदर्श करण्यासाठी लोकसहभाग मिळविला पाहिजे.


तरच आपल गाव स्वच्छ सुंदर,हरीत गाव, जलसमृद्ध गाव बनेल आपल्या गावचा नऊ संकल्पना व सतरा उद्दीष्टे पूर्ण झाल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही.आपल्या गावातील शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी,समाजातील सर्व घटकाचा विकास झाला पाहिजे.याकरिता आपल्याला काम करायचे आहे.या सरपंच परिषदेत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष,जयंतदादा पाटिल यांनी यथोचित दाखले देत उत्कृष्ठ प्रबोधन केले.सरपंच परिषदेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सरपंच,उपसरपंच उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !