राज्य पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष,प्रा.महेश पानसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी साजरा.


राज्य पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष,प्रा.महेश पानसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी साजरा.


एस.के.24 तास


चंद्रपूर : (नितेश मँकलवार) राज्य पञकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा महेश पानसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी विवीध उपक्रमानी साजरा करण्यात आला.सकाळी नवभारत क.वि. महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात वाढदिवस साजरा केला.

त्या नंतर महाविद्यालयात प्रा,अशोक झाडे यांचे अध्यक्षतेखाली प्राध्यापक,महेश पानसे यांचा सत्कार समारंभ आयोजीत करून वाढदिवस साजरा करण्यात आला.


सुभाष विद्यालयात संपूर्ण शिक्षक व विद्यार्थी यानी केक कापून व गोड सहभोजनाने वाढदिवस साजरा केला.यात मूल तालुका संघ पदाधिकार्याची उपस्थिती होती.


मूल येथे उपजिल्हा रूग़णालयात रूग्णांना फळे  वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.चिमूर येथे पञकार संघ तालुका अध्यक्ष,केवलसिंह जूनी यांचे समवेत उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना खाद्यपदार्थ  व फळे  वाटून महेश पानसे यांचा वाढदिवस साजरा केला. 

  

याशिवाय वरोरा तालुका संघाने शालेय विद्यार्थी याना नोटबुक वाटप करण्यात आले.वाढदिवस साजरा केला.बल्लारशाह तालुका,रामटेक तालुका,राजूरा तालुका,संघानी वेगवेगळे उपक्रम राबविले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !