माळी समाजाचा योद्धा काळाच्या पडद्याआड.
राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास
मुल : एस.के.24 तास न्युज नेटवर्क चे उपसंपादक, राजेंद्र वाढई यांचे सोयरे तालुक्यातील भेजगाव येथील माजी,सरपंच रामदासजी लेनगुरे 55 वर्ष यांचा काल दि.23/2/2023 रोजी साय. 5: 00 वा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
भेजगाव नदी वर 1: 00 वा.अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भेजगाव येथील जनतेनी रामदासजी लेनगुरे यांचेवर विश्वास दाखविला त्यामुळे ते दोनदा गावचे संरपंच होते त्या काळात त्यानी गावाच्या विकासाची अनेक कामे केली.
रामदासजी लेनगुरे हे दमदार,धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते होते.जेमतेम आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य वाखाण्याजोगे आहे,त्याचा संघर्ष युवा पिढीला प्रेरणा दायी आहे .
माळी समाजातील एक योद्धा हरवलाय,
शोकाकुल : - समस्त माळी समाज,
भावपुर्ण श्रध्दांजली...💐💐💐