हिरापूर येथिल गावठाण जागेचे गरजू ग्रामस्थांना वाटप करा. - प्रमोदजी कोडापे
भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा महामंत्री, माजी सरपंच तथा सदस्य ग्रा.पं.हिरापूर,प्रमोदजी कोडापे यांची कोरपना तहसीलदारांना निवेदनद्वारे मागणी.
एस.के.24 तास
कोरपना : तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायत च्या हद्दीतील शेत सर्वे क्र.61/2 याठिकाणी मागील 30 वर्षांपासून गावठाण चा सर्वे क्र.पडलेला आहे, त्या ठिकाणी काही ग्रामस्थांना प्लॉट चे वाटप करून पावत्या पण देण्यात आल्या,व उर्वरित प्लॉट शिल्लक होते,परंतु आजपर्यँत या जागेचे वाटप करून ग्रामस्थांना देण्यात आले नाही.
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे ग्रामस्थांना गावठाण मधील जागेची गरज जाणवत असून ती ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण मधील जागा ग्रामस्थांना प्लॉट ची कार्यवाही करून वाटप करून देण्यात यावी,जेणे करून ग्रामस्थांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्यास सोईचे होईल.व ग्रामस्थांच्या इतरत्र पण ती जागा कामी येणार.जाणवणाऱ्या जागेच्या टंचाई चा पण प्रश्न सुटेल अशी मागणी भाजपाचे आदिवासी आघाडीचे जिल्हा महामंत्री हिरापूर ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा सदस्य,प्रमोदजी कोडापे यांनी कोरपना तहसीलदारांना निवेदनद्वारे केली आहे.
यावेळी सोबत ग्रामपंचायत चे उपसरपंच अरुणजी काळे हे उपस्थित होते.