पदाची जाणिव तेवत ठेवा. - अश्विन शेंडे.

पदाची जाणिव तेवत ठेवा. - अश्विन शेंडे.


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : कोणत्याही क्षेत्रातील पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो.कोणत्याही माणसाचे महत्त्व पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नसतो तर तो त्या पदाला किती न्याय देतो तर तो किती कार्यक्षम, कर्तृत्व, नेतृत्व, दाखवतो त्यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते.


कर्तुत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहम पणा,स्वार्थपणा,लबाडी,व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याच्या गर्व खाली होतो पदामुळे तात्पुरते महत्त्व वाढते पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्त्व राहते पदामुळे आपल्याला असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे त्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे त्याची जाणीव निरंतर व कायमच ठेवली पाहिजे.


व्यक्ती जेव्हा समाजात जितक्या उंचीवर पोहोचतो तो निवड त्याच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या बऱ्याच लोकांनी केलेल्या त्यागाच्या सुद्धा त्यात महत्त्वाच्या वाटा असतो. म्हणून संबंधितांनी आपल्या स्वतःला मोठा म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात याची जाणीव ठेवून वागलेलं बरं.


ज्या पायरीच्या सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये कारण त्या पायरीच्या आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!


लक्षात असू द्या पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता कर्तृत्व वागणं प्रामाणिकता व बोलणं पहात असतो.. ऐकत असतो आणि सहनही करत असतो मात्र लबाडी पणा वाढला तर योग्य वेळी धडा शिकवतो..? तिथे तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते.


म्हणूनच आपल्या माणसाची समाजाशी व विश्वासू मित्रांची नीट वागा नीट बोला व आपले कर्तुत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिद्ध करा तरच समाज तुमच्या पाठीशी राहील जो दुसऱ्याला मान देतो तो स्वतः सन्माननीय असतो कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असते.. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होते म्हणून प्रत्येक व्यक्तीने पद आहे म्हणूनच काम केलं पाहिजे असं नाही पण हे आपण मागून नाहीतर आपल्या समाजाने दिले पाहिजे तरच त्या कर्तुत्वाला मानसन्मान मिळतोय.


पद म्हणजे मी कोणी मोठा आहे हे ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून आपली उतरती कडा सुरू झाली ती समजून जा यामुळे पदाच्या गर्व काढून पदाला न्याय मिळेल असेच काम करा.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !