वाघाने केली बैलांची शिकार तर गाय गंभिर जखमी.

वाघाने केली बैलांची शिकार तर गाय गंभिर जखमी.    


नरेंद्र मेश्राम !प्रतिनिधी,भंडारा


भंडारा : अडयाळ वनक्षेञातर्गत येत असलेल्या किटाडी सहवन क्षेञाअंतर्गत देवरी बिटात कक्ष क्र.213 मध्ये वाघाने केली बैलाची शिकार तर गाय गंभीर जखमी केल्याची माहिती बिटरक्षक नितिन पारधी यांनी दिली.घटना अशी की शुक्रवारला दुपारी चार वाजताच्या सुमारास जंगल परिसरात गुराखीनी चराई करिता जंगलामध्ये  जनावर नेले असता आडोशाला दंभी धरुन असलेल्या पट्ठेदार वाघाने बैलावर हल्हा केला.


तेव्हा वाघाचा डरकाडीचा आवाज आल्याने त्या गुराख्यानी आरडाओरड केला असल्याने गावकरी मोठ्या संख्येनी आल्याने वाघ पसार झाला.माञ वाघोबा जवळपासच असल्याचे संकेत मिळाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.बैल ठार झाल्याने रांजेद्र रामाजी मारोदे रा.किटाडी या पशुपालकाचे अंदाजे तीस हजार रुपयाचे नुकशान झाले .घटनेची माहिती मिळताच देवरी बिटरक्षक नितिन पारधी,रेंगोडा बिटरक्षक संदिप गायकवाड, वनमजुर भिवा दिघोरे,वपामिर नागलवाडे मोका चौकशी करुन पंचनामा केला.मृत बैलाचा शवविच्छेदन पालांदुर पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ.दिव्यांनी नगराडे यांनी केला.


जिल्ह्यातील जंगलव्याप्त परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याने संपुर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले अाहे.वनविभागाने लवकरात लवकर गस्त घालुन वाघाला बंदिस्त घालुन बंदोबस्त करावे. व त्या नुकशानग्रस्त पशुपालकाला नुकशानभरपाई द्यावी अशी मागणी परिसरात चर्चील्या जात आहे. किटाडी वनपरिक्षेञाधिकारी शामकुवर चौकशीकरिता हजर नसल्याचे कळते हे विशेष.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !