निलज येथे शिवजयंती निमीत्त आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी व औषधोपचार.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : दिनांक : २३/०२/२३ ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथील शिवजन्मोत्सव समीती,युवा विकास मंच व महिला मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिरात तज्ञ डाॅक्टरांनी शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करीत औषध,गोळ्या वितरीत करण्यात आल्या.
सदर शिबीरात ब्रम्हपुरी येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. शिशिर वंजारी,दंत चिकित्सक डॉ.राहुल मेश्राम,फिजीशियन डॉ.जि.एम. बालपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत भुरले,कम्युनिटी हेल्थ आॅफीसर तनुजा मेश्राम, पॅथालाॅजिस्ट चारूलता चौधरी, रूचिता ढोरे, बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ( बि.फार्म) राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी,प्रा.श्रिकांत महाजन ह्यांनी उपस्थित राहुन आपली सेवा दिली.
यावेळी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेसह शिवाजी महाराज पालखी सोहळा, वक्तृत्व स्पर्धा, महिला व मुलींसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, शिवजन्मोत्सव पाळणा, तर कला महोत्सवात नृत्य, नकला, अभिनय, गायन स्पर्धा पार पडल्या. विविध स्पर्धांमधील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षीसे तर विजेत्यांना रोख बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन भर्रे,राहुल मैंद यांनी केले. तर प्रास्ताविक सरपंच हेमंत ठाकरे यांनी केले.
यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समीतीचे सदस्य, महिला मंडळ व गावकऱ्यांनी सहकार्य केले.