कुर्झा वार्डात महाशिवरात्र व शिवजयंती उत्सव : प्रबोधन,भव्य रॅली,पुतळयाचे अनावरण.

कुर्झा वार्डात महाशिवरात्र व शिवजयंती उत्सव : प्रबोधन,भव्य रॅली,पुतळयाचे अनावरण. 


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : १७/०२/२३ ब्रह्मपुरी येथील कुर्झा वार्डात महाशिवरात्री निमित्त व  शिवजयंतीचे औचित्य साधून भव्य -दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  

शनिवार दि .१८ फरवरीला कुर्झा वार्डातील स्मशानभूमीस्थित भोले शंकराच्या मूर्तिचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडणार असून सायंकाळी मराठा नगरा समोरील संत जगनाडे महाराजांच्या मूर्तिचेही अनावरण मान्यवर करतील.


दिनांक १९ फरवरीला शिवजयंतीचे औचित्य साधून सायंकाळी ७.०० वा. शिवाजी चौकामध्ये ' रयतेचा राजा खरा शिवाजी ' या विषयावर प्रबोधन कार्यक्रम मान्यवर वक्ते डॉ धनराज खानोरकर,डॉ,मोहन कापगते,राहुल मैद यांच्या उपस्थितीत पार पडेल.यावेळी वार्डाचे नगरसेवक व ब्रह्मपुरी नगर पालिकेचे बांधकाम सभापती विलास विखार,नगरसेविका सौ खेत्रे उपस्थित राहतील.यानंतर वार्डातून शिवाजी महाराजांची देखणी भव्य शोभायात्रा निघणार आहे.


यानिमित्त सोमवारला सायंकाळी वार्डातील नागरिकांसाठी भोजदान कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.वरिल सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !