व्यवसायासाठी अर्थसाहाय्य न घेताही बँकेने लावले दुकानास सिल. ; अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक प्रशासनाचा अफलातून कारभार.

व्यवसायासाठी अर्थसाहाय्य न घेताही बँकेने लावले दुकानास सिल. ; अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक प्रशासनाचा अफलातून कारभार.

                

★ सिल काढण्यासाठी महिला व्यवसायिकाचा बँकेशी पत्र व्यवहार.


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!एस.के.24 तास


भंडारा : दी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मुख्य शाखेकडून कसल्याही प्रकारचे कर्ज घेतले नसतांना वसुली अधिकाऱ्याने दुकान मालकाच्या अनुपस्थितीत दुकानाला सिल केल्याची तक्रार रुपाली भुरे ह्या व्यवसायिक महिलेने केली आहे. बेकायदेशीरपणे दुकानास केलेले सिल २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पर्यंत काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्बन बँक यांचेशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे.


रुपाली शिशुपाल भुरे ह्या महिला व्यवसायिकाचे म्हाडा कॉलनी, खात रोड भंडारा येथे शिशुपाल ऑटोमोबाइल्स हे प्रतिष्ठान असून त्यात दुचाकी वाहनाचे सुटे भाग विक्री व दुरुस्तीचे काम केले जाते. याकरिता ४ कर्मचारी कामास आहेत. या व्यवसायासाठी इंडियन ओव्हेरसिज बँक व श्रीराम सिटी बँक यांचेकडून अर्थसाहाय्य घेतले होते. पण महाशिवरात्री निमित्त ही व्यवसायिक महिला बाहेरगावी यात्रेस गेली असता १९ फेब्रुवारी रोजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या नावाने सिल लावले असल्याचे व त्यात कर्ज वसुली दंडात्मक कारवाई असे नोटीस दुकानाला चिकटविलेले २१ फेब्रुवारी रोजी परत आल्यावर कळले.


या महिला व्यवसायिकाने दी भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही किंवा कोणत्याही कर्जदाराच्या जामीनदार नाहीत. पण बँकेने कसलीही सूचना न देता गैरहजेरीत माझे प्रतिष्ठानास  सिल ठोकलेले आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात महिला व्यवसायिकाकडून नमूद केले आहे. या बेकायदेशीर कारवाईमुळे त्यांना मानसिक आघात, सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसान होत आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार अर्बन बँकेचे वसुली अधिकारी असून त्यांचेवर उचित कारवाई करून दुकानाला लावलेले सिल काढून अर्बन बँकेने माफी मागावी अशी मागणी रुपाली यांनी केली आहे.


 या करिता महिला व्यवसायिक रुपाली शिशुपाल भुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भंडारा यांचेशी पत्र व्यवहार केला असून बँकिंग लोकपाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वरळी मुंबई, पोलिस ठाणे भंडारा व शाखा व्यवस्थापक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मुख्य शाखा गांधी चौक भंडारा यांचेकडे प्रतिलीपी पाठविण्यात आल्या आहेत. बँकेकडून काय कारवाई केली जाते. याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !