ए.टी.एम.कार्डची अफरातफर करून फसवणूक करणारे आंतरराज्य टोळी ब्रम्हपुरी पोलीसांच्या ताब्यात.


ए.टी.एम.कार्डची अफरातफर करून फसवणूक करणारे आंतरराज्य टोळी ब्रम्हपुरी पोलीसांच्या ताब्यात.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दि.१३/०२/२०२३ विविध बँकाकडून जनतेच्या सोईसाठी उपलब्ध होणारे ATM कार्ड दुवारे फसवणूक करून त्यांच्या कष्टाचे पैसे दुसऱ्या ATM मशीनमधून काढून लुबाडणूक करणारी हरीयाणा राज्याची टोळी ब्रम्हपरी पोलीसांच्या हाती लागून एका रॅकेट उघड झाले आहे.


गुन्हयातील आरोपीतांची टोळी वेगवेगळया राज्यात फिरून एटीएममध्ये गर्दी पाहुन ज्यांना ATM कार्ड वापरता येत नाही त्यांना हेरून पैसे काढण्याकरीता मदत करण्याचे बहाण्याने त्याचे एमटीएम कार्ड ची अदलाबदली करून दुसरे एटीएम कार्ड देवून वेगवेगळया ए.टी.एम.मधून पैसे काढुन फसवणुक करीत होते.


दि.२५/११/२०२२ रोजी ब्रम्हपुरी येथील SBI बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यास गेलेले माजी सैनीक नामे वामन गोसाई दिघोरे रा.किन्ही ता.ब्रम्हपुरी यानी अज्ञात आरोपीने पैसे काढण्यात मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे ATM कार्ड बदलुन दुसरे कार्ड दिले. त्याना त्यावेळी सदर फसवणूक लक्षात आली नाही. ३ दिवसांनी परत ATM मध्ये जावुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा माहीत झाले की,आपली फसवणुक झाली आहे. 


त्यांनी बँकेत जावुन स्टेटमेंट काढले असता १०,००० रु वडसा येथील ATM मधुन विड्रॉल झाल्याचे समजले तसेच ७४.९९७ रुपये ऑनलाईन ट्राझेक्शन झालेले दिसले असे एकूण ८४.९९७ रुपये ची फसवणुक झालेली असल्याने त्यांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध तकार दिल्याने अप.क. ५८७/२०२२ कलम ४२० भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 


गुन्हयाचे तपासादरम्यान सीसीटिव्ही फुटेज व विविध तांत्रिक पुराव्या च्या आधारे यातील आरोपी हे मौजा हंसी जि.हिसार राज्य हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून ते वापरत असलेले वाहन हरीयाणा पासींग आहे. याची खात्री पटली. त्या आधारे आरोपींचा शोध सूरू झाला.सदर ठिकाणी दि.०७/११/२०२२ ला पथक पाठविले असता आरोपी हे त्या ठिकाणावरून पसार झाले होते.


दि.११/०२/२०२३ रोजी सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली कि गुन्हयातील आरोपी हे आदिलाबाद कडे अश्याप्रकारचा गुन्हा करण्यासाठी निघाले असल्याने तात्काळ पोलीस पथक गठीत करुन जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगाना कडे रवाना केले.पथकाला पुन्हा माहिती मिळाली की,आरोपी हे टाटा नेक्सन कार क.एच आर २१ पी ०१२५ ने आदिलाबाद करून नागपुर कडे जात आहे. 


तेव्हा पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करीत असताना आरोपी हे चारचाकी वाहनाने समोर असल्याने पो.स्टे बुटीबोरी नागपुर ग्रामीण पोलीसांना कळवून त्याचे सहकार्याने कार थांबवुन कारमधुन तीन इसमास ताब्यात घेण्यात आले.


त्यांची नावे पुढीलप्रमाणे : -

१) जोगीदरसिंह चंदरसिंह बिटट्टु वय,२६ वर्ष रा. पुठठी सामान ता नारनोंद जि.हिसार राज्य हरीयाणा

 २) राजेश रेलुराम माला वय,४५ वर्ष रा.हंसी जि, हिसार राज्य हरीयाणा 

३) पुनीत शिवदत्त पांचाल,वय,३२ वर्ष रा.बुडाबाबा वस्ती जिद ता.जि.जिंद राज्य हरीयाणा 

यांच्या ताब्यातुन ७२ ATM कार्ड, ४३,०००रु. रोख रक्कम, तीन मोबाईल, गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेली Tata nexon car no. HR 21 P-0125 वाहन जप्त करण्यात आले.


सदर आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेले ATM कार्ड हे विविध राज्यातील व्यक्तीचे असल्याने आरोपी हे राजस्थान,गुजरात,तेलगांना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यामध्ये ए.टी.एम.ची अदलाबदल करुन नागरिकांची फसवणुक करीत असल्याचा दाट संशय आहे.सदर आरोपी सध्या पोलीसांच्या अटकेत आहेत.


सदरची कार्यवाही मा.रविंद्रसिंह परदेशी सा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर व मा.श्रीमती,रिना जनबंधु मॅडम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या सुचने प्रमाणे श्री.मिलींद शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी व पो. नि. रोशन यादव सा.पो स्टे ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे,नापो / २५५२ मुकेश गजबे, नितीन भगत / २३७९, योगेश शिवणकर / १७३४, पोशी / २३३२ संदेश देवगडे, विजय मैद / १६३, अजय कटाईत / २५२२ यांनी केलेली आहे. 


गुन्हयाचा पूढील तपास सपोनी प्रशांत ठवरे करीत आहेत. तरी नागरीकाना आवाहन करण्यात येते कि, आपल्या सोबत अशा प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.सदर घटना आपल्या सोबत झालेली असल्यास पो.स्टे.ब्रम्हपूरी येथे संपर्क साधावे.

पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी मो.नं. - ७८८७८९१०८९

- रोशन यादव,पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !