समाज बांधवांच्या सर्वांगीन विकासाकरिता समाजाला संघटित करणे आवश्यक. ★ लोहार समाजाच्या मेळाव्यात विशेष अतिथी माजी,आमदार निमकर यांचे प्रतिपादन.

समाज बांधवांच्या सर्वांगीन विकासाकरिता समाजाला संघटित करणे आवश्यक.         


★ लोहार समाजाच्या मेळाव्यात विशेष अतिथी माजी,आमदार निमकर यांचे प्रतिपादन.


एस.के.24 तास


राजुरा : लोहार समाज संघटना तालुका राजुरा च्या वतीने रविवार दि.5 फेब्रुवारी 2023 रोजी राजुरा येथील धानोजे कुणबी समाज भवनात प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव व वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याचे उद्घाटन मा.चरणदास बावणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षसथानी चंद्रपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस.एस.कामटकर हे होते.कार्यक्रमाचे संचालन मोहनदास मेश्राम गुरुजी यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चंनदखेडे यांनी केले.

मेळाव्याची पार्श्वभूमी व समाजाच्या समस्या व पुढील वाटचाली संबंधी ची माहिती तालुका सल्लागार सुधाकर चंदखेडे यांनी आपल्या मनोगतातून दिली.प्रमुख अतिथी सुरेश मांडवगडे, शामरावजी चाफेकर,रामदासजी शेंडे, डॉ.वासुदेवराव बांगडकर,अनिल मेश्राम, जितेश मेश्राम,गोपाल शेंडे,भाऊराव चंदनखेडे सह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. 

त्यात प्रामुख्याने सौ.नलिनी मोहनदास मेश्राम या गृहिणीने घर सांभाळून तब्बल ५ विषयात पोस्टग्रज्यूएट झाल्याबद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. मेळाव्यात वधू-वरांनी परिचय दिला.कार्यक्रमात मोठ्यासांख्येने समाज बांधव उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !