मालडोंगरीची सृष्टी जिल्हास्तरीय नवरत्न कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी : १७/०२/२३ ज्युबिली हायस्कूल चंद्रपूर येथे नुकताच पार पडलेल्या जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण" नवरत्न स्पर्धेत" जि.प.उच्च प्राथमिक शाळा,मालडोंगरी येथील इयत्ता सहाव्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु.सृष्टी प्रमोद सहारे हिने जिल्हास्तरीय नवरत्न कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपोच्यात मानाचा तुरा रोवला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला.तसेच जिल्हा परिषद चे कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व त्याकरिता एक-एक मार्गदर्शक यांसाठी स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस म्हणून आय.आय.एम व इस्रो,बेंगलोर येथे शैक्षणिक सहल आयोजित करून देण्याची घोषणा केली.
सदर सत्कार समारंभाला मालडोंगरी येथील सरपंच सौ मंजुषा ठाकरे,उपसरपंच विनोद घोरमोडे,जनताभाऊ ठेंगरी अध्यक्ष गु.से.मंडळ, रवीजी ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष,राकेश चौधरी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,राजूभाऊ पिलारे ग्रा.पं.सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक नामदेव बगमारे तथा सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
सदर सत्कार सत्तर सत्कार समारंभ प्रसंगी मान्यवरांनी कुमारी सृष्टीला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.श्रुष्टीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,मुख्याध्यापक बागमरे,मार्गदर्शक शिक्षिका सौ.दशसहस्त्र मॅडम व सर्व शिक्षक वृंदांना दिल्या सृष्टीच्या या यशामुळे तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.