महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मूल चा वतीने आदरणीय प्राध्यापक,महेश पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ मूल चा वतीने आदरणीय प्राध्यापक,महेश पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.


एस.के.24 तास


मूल : (नितेश मॅकलवार) राज्य पञकार संघाचे पूर्व विदर्भ  प्रा महेश पानसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी विवीध उपक्रमानी साजरा करण्यात आला.सकाळी नवभारत क.वि.महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात वाढदिवस साजरा केला.

त्या नंतर महाविद्यालयात प्रा,अशोक झाडे यांचे अध्यक्षतेखाली प्राध्यापक,महेश पानसे यांचा सत्कार समारंभ आयोजीत करून वाढदिवस साजरा करण्यात आला.सुभाष विद्यालयात संपूर्ण शिक्षक व विद्यार्थी यानी केक कापून व गोड सहभोजनाने वाढदिवस साजरा केला.यात मूल तालुका संघ पदाधिकार्याची उपस्थिती होती.

मूल येथे उपजिल्हा रूग़णालयात रूग्णांना फळे  वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.मूल येथे पञकार संघ तालुका मूल चा वतीने उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना खाद्यपदार्थ  व फळे  वाटून महेश पानसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.मूल तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मूल तालुका अध्यक्ष सतीश आकुलवार समवेत, प्रसिद्धी प्रमुख नितेश मॅकलवार,सदस्य सतीश राजुरवार, सदस्य धर्मेंद्र सूत्रपवार,व संघांचे अनेक पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !