मानेगाव (सडक)येथे जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा यांच्या कार्यांची पुनरावृत्ती.

मानेगाव (सडक)येथे जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा यांच्या कार्यांची पुनरावृत्ती.


 ( निराधारांना अन्न,वस्त्र,निवारा, आरोग्य आणि पुनर्वसन कार्यक्रम संत गाडगेबाबा अनाथालय केंद्रांचे ऐतिहासिक उपक्रम.)


नरेंद्र मेश्राम!प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : लाखनी तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या मानेगाव (सडक ) येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2023 ला वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देत निराधारांना अन्न , वस्त्र,निवारा,आरोग्य आणि पुनर्वसन करण्यासाठी संत गाडगेबाबा अनाथालय केंद्रांचे ऐतिहासिक उपक्रम व कार्याला गती देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे.


मागील अनेक वर्षापासून अभिनव मानव कल्याण बहुउद्देशीय संस्था व  BDPPSS Sanstha , Palanpur (chau.) द्वारा संचालित संत गाडगेबाबा अनाथालय केंद्र मानेगाव (सडक) मार्फत natural environment conservation,human development and planning (नैसर्गिक पर्यावरण संगोपन  , मानव कल्याण कार्य व उपक्रम ) उद्दिष्टे अंतर्गत विकलांग,मतिमंद,अंध - अपंग,भटके -भिकारी, वृद्ध,निराधारांना आसरा व आधार आणि पुनर्वसन करण्यासंबंधाने अन्न,वस्त्र,निवारा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे अविरत कार्य सुरू आहे. 


या अनुषंगाने लाभार्थ्यांना सुविधा सुलभ व्हावी म्हणून मानेगाव (सडक) येथे भोजनदानाचे लंगर (बूथ) वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त लावून सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे या ऐतिहासिक कार्याला अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संचालकाचे अभिनंदन करून गौरविले आहे.


संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मानेगाव (सडक ) ग्रामपंचायत उपसरपंच अजित मेश्राम , प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच तथा मनोज सेलोकर , भंते सदानंद,सामाजिक कार्यकर्ते अशोक सिंगंजुळे , संचालक /अध्यक्ष डी.पी.बडोले, स्वयंसेवक हरिदास सेलोकर ,  नाना भांडारकर , दिलीप सिंगनजुडे,संतोष उकनकर,रवींद्र (बापू) डोरले,व्यंकट चौधरी,बालू काळे,उमेश आगरे , अभय बडोले,करण सिंगंजुळे,रोशन खोब्रागडे , अमोल घुले,रक्षानंद नंदागवळी,प्रामुख्याने उपस्थित होते. 


यावेळी अनेक मान्यवरांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्यावर उजाळा घालून  संस्थेने खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबा यांच्या कार्याला गती देण्याचे अतिआवश्यक व महत्वाचे आणि मोलाचे कार्य हाती घेऊन उपक्रम चालविले असल्याचे मार्गदर्शनात संबोधित करून संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त व संपूर्ण कार्याबद्दल  सदिच्छा व्यक्त केलेल्या आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !