माय मराठीचे संवर्धन करणे काळाची गरज. मराठी भाषा गौरव दिन : प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर.

माय मराठीचे संवर्धन करणे काळाची गरज.


मराठी भाषा गौरव दिन : प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,२७/०२/२३ मराठी भाषेत समृध्द साहित्य उपलब्ध आहे.मराठी आज अकरा कोटी जनतेची व्यक्त होण्याची भाषा आहे.ज्ञानेश्वरापासून होनाजीपर्यंत तर त्यापुढे आजतायगत मराठीत विपुल साहित्य निर्माण झाले.पाश्चात्य भाषेचे आक्रमक मराठीवर होत आहे, म्हणून माय मराठीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे " असे प्रतिपादन चामोर्शी येथील केवलराम हरडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपुरकर यांनी केले.


  ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभाग व संशोधन केंद्राच्यावतीने ' मराठी भाषा गौरव दिन ' व कविवर्य कुसुमाग्रज जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे,अशोक बनपुरकर व मराठी विभाग प्रमुख,कवी डॉ,धनराज खानोरकर उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ,गहाणेंनी,इतर भाषा डोक्यापर्यंत पोहतात तर मातृभाषा हृदयापर्यंत पोहचते. 


मातृभाषेत जे सुख,आनंद तो आनंद इतर भाषा देऊ शकत नाही,असा मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ धनराज खानोरकर, डॉ प्रकाश वट्टी व डॉ पद्माकर वानखडेचा पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.


  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांच्या परिचय विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकरांनी,संचालन डॉ प्रकाश वट्टींनी तर आभार डॉ पद्माकर वानखडेंनी केले.यशस्वीतेसाठी प्रा माधव चुटे,प्रा,अस्मिता कोठेवार,प्रा,प्रशांत राऊत,गोपाल करंबे व साहित्याच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !