शा.औ.प्र.संस्थेच्या रासेयो शिबिराचे उद्घाटन : ग्रामस्वच्छतादिंडी आणि व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शनीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष.
★ रासेयो शिबिर म्हणजे नवयुवकांना ग्रामपरिवर्तनाची दृष्टी देणारी चळवळ - प्राचार्य रवींद्र मेहेंदळे.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मोरवा येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात करण्यात झाले.या शिबिराचे उद्घाटन मोरवा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.स्नेहाताई साव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते.उपसरपंच भूषण पिदूरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळा अतकरी,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक अनिल आंबटकर,श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक बाबा पानघाटे,कार्यक्रम अधिकारी गटनिदेशक एन.एन.गेडकर, जितेंद्र टोंगे आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक रासेयो सहकार्यक्रम अधिकारी बी.आर. बोढेकर यांनी सदर संस्थेचे शिबिर २० वर्षांनंतर पुन्हा मोरवा येथे होत असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. तसेच हे शिबिर प्रशिक्षणार्थ्यांना निश्चितच दिशादर्शक ठरेल असे मत मांडले. उपसरपंच भूषण पिदूरकर यांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या तर मुख्याध्यापक अनिल आंबटकर यांनी मानवी जीवनात कौशल्य विकासाचे महत्त्व यावर भाष्य केले. सरपंच सौ. स्नेहाताई साव यांनी समाजातील वाढती अंधश्रद्धा यावर चिंता नोंदवत अंधश्रद्धा निर्मुलनाचे उपक्रम गावोगावी व्हावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी रासेयो शिबिराचे महत्व सांगून अशा श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्त्व घडत असते,असे ते म्हणाले.सूत्रसंचालन आणि शिबिराची दैनंदिनीवर एन.एन.गेडकर यांनी प्रकाश टाकला.आभार प्रदर्शन रमेश रोडे यांनी केले.आयोजनासाठी निदेशक महेश नाडमवार, रमेश रणदिवे,बंडू कांबळे,रामभाऊ लांडगे,अमित राघोर्ते,किशोर बोंबले आदींनी परिश्रम घेतले.
शिबिर परिसरात नशाबंदी मंडळाच्या वतीने व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्या प्रदर्शनीचे अवलोकन मोरवा ग्रामस्थांनी केले. दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात, रामभाऊ लांडगे,बाबा पानघाटे,रमेश रणदिवे यांनी योगासने संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले.त्यानंतर मोरवा गावात स्वच्छता दिंडी काढण्यात आली.