मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने कोरपना तालुक्यात मुलींच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित.
एस.के.24 तास
कोरपना : दिनांक 11फेब्रुवारी रोजी मौजे कन्हाळगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल स्पोर्ट्स फाॅर गर्ल च्या सहकार्याने मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर च्या वतीने कोरपना तालुक्यातील निवडक शाळांच्या मुलींच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या वेळी सहा टीम सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मा.नारायण हिवरकर साहेब हे होते.
त्यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यावेळी उपसरपंच कन्हाळगाव तसेच मुख्याध्यापक श्री,शुक्ला सर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम चे प्रोजेक्ट लीड अरूण मोहिते यांनी केले.क्रिकेट स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हाळगाव यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक प्रियदर्शनी हायस्कूल पारडी यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक दगडुजी देशमुख विद्यालय पटकावला यावेळी उत्कृष्ट फलंदाज चषक म्हणून वैष्णवी बोरकुन्डे हिला माजी सरपंच साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रगती यालमवार हिला माजी सरपंच साहेब यांचे हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाला मंडप व्यवस्था, भोजन व्यवस्था,सांऊड सिस्टीम व्यवस्था मा. नारायण हिवरकर साहेब शा.शि.समिती अध्यक्ष यांनी दिली त्याबद्दल मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर च्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी बक्षीस वितरण समारंभ संपन्न करण्यासाठी मा मुख्याध्यापक,श्री शुक्ला सर यांनी सुत्रसंचलन केले.व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.तसेच कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल स्पोर्ट्स फाॅर गर्ल टीम कडून सर्व उपस्थितांचे आभार मानले.