पट्टेदार वाघाच्या झुंजीत बिबट जागीच ठार.

पट्टेदार वाघाच्या झुंजीत बिबट जागीच ठार.


नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास


सिंदेवाही : सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक  276 R. F. खैरी, पवनपार या ०१ की.मी.अंतरावर बिबट (Leopard) आणि पट्टेदार वाघाच्या (Tiger) झुंजीत (fight) बिबट जागीच ठार झाल्याची घटना काल रात्रीला १२:०० च्या दरम्यान घडली.

ही घटना घडल्याची माहिती वनविभागाला मिळताचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनाक्रमाची शहानिशा केली.


त्या नुसार असे निदर्शनास आले की, पट्टेदार वाघ व बिबट यांच्यात जोरदार झुंज होऊन बिबट्याचा जागीच मुत्यू झाल्याची प्रथम दर्शनी माहिती  मिळत आहे.त्यावेळी सहाय्य्क उपवनसंरक्षक चोपडे,वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर, क्षेत्रसहाय्यक बुरांडे,वनरक्षक व्ही.बी.सोरते, वनरक्षक सोरते,वनरक्षक येरमे व वनरक्षक राठोड यांच्या उपस्थितीत मोक्का पंचनामा करून बिबट्याचा शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.त्यानंतर बिबट्याच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आली.


मरेगाव,Organised व पवनपार उपक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघांचे बस्तान असून जंगलामध्ये वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच या भागातील गावांना जोडणारा मार्ग  जंगलव्याप्त असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या मार्गाने प्रवास करताना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो आहे.


या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना हमखास व्याघ्रदर्शन होत असते.त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.त्यातच अशा घटनांमुळे वनविभागाने या वाघांचे बंदोबस्त करून या परिसरातील जनतेप्रती सहकार्याची भावना ठेवून काम करावे अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !